पालघर : काश्मीरातील पुलवामा हल्ल्यानंतर देशात सर्वच ठिकाणी हाय अलर्ट जारी असताना पालघरपोलिसांची शंभर नंबरची हेल्प लाईन बंद असल्याने आपत्कालिन स्थितीत नागरिकांनी फोन करायचा कुणाला असा सवाल विचारला जात आहे. या संदर्भात जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या जनसंपर्क विभागाशी संपर्क साधला असता त्यांनी बीएसएनएल च्या लालफितीच्या कारभारापुढे हतबलता व्यक्त केली आहे.
पालघर पोलिसांनी या संदर्भात बीएसएनएलला सतत पत्रव्रवहार करून देखील भारत संचार निगम लिमिटेड कंपनी पालघर पोलिसांना दाद देत नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे पालघरवासियांची सुरक्षा जणू रामभरोसे असल्याचा आरोप होत आहे. शंभर नंबर हा अत्यंत महत्वाच्या व सर्वसामान्य नागरिकांना पोलीसांशी संपर्क साधण्याचा मार्ग आहे. पुलवामाची घटना ताजी असतानाचं दोन दिवसांपूर्वी नाशिकाजवळील देवळाली मिलिटरी कॅम्प व रेल्वे स्थानक परिसर बॉम्बद्वारे उडवण्राचे निनावी धमकी पत्र नाशिक पोलिसांना हाती लागले असून त्याच परिसरात एक संशरास्पद बॅगही आढळून आली होती. आज पून्हा हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेकडून एका आॅडिओद्वारे सरेंडर होण्यापेक्षा आम्ही मरण पत्कारू असे सांगत, पुलवमासारखा दहशतवादी हल्ला पून्हा घडवून आणण्याची धमकी दिली आहे.