घाटातील अपघातात २५ प्रवासी जखमी; मुरु ड-दापोली-पुणे बस
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2019 02:01 AM2019-02-10T02:01:09+5:302019-02-10T02:01:21+5:30
दापोली तालुक्यातील मुरुड येथून शनिवारी सकाळी सुटलेल्या मुरुड-दापोली-पुणे एसटीला महाडजवळ रेवतळे घाटात सकाळी ९ च्या सुमारास अपघात झाला.
अलिबाग : दापोली तालुक्यातील मुरुड येथून शनिवारी सकाळी सुटलेल्या मुरुड-दापोली-पुणे एसटीला महाडजवळ रेवतळे घाटात सकाळी ९ च्या सुमारास अपघात झाला.
महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल असलेल्या १६ प्रवांशांमध्ये, अक्षय सुबोध कासारे (२३, रा. दावड, रत्नागिरी), प्रभाकर राजाराम गायकवाड (५५, चिंचवड-पुणे), ऊर्मिला लक्ष्मण बटावले (६०, मुरुड, ता. दापोली), शिल्पा शरद केळकर (६४, पुणे), हेमलता संतोष मोरे (३५, दापोली), सुनंदा मारुती तांबट (७१, दाभोळ, रत्नागिरी), मंगेश तांबट (५३, दाभोळ, जि. रत्नागिरी), अंजुम अजीज सय्यद (४४, दापोली, रत्नागिरी), अशोक व्यंकटराव पवार (६९, सोंडेघर, दापोली), चारंबी खान (७५, महाबळेश्वर), फौजिया तनविर कोंडेकर (२२, शिरवली, महाड), अशोक तुकाराम येरुणकर (६२, शिरसेश्वर, दापोली), मीना चंद्रकांत कुसगांवकर (५८, दाभोळ, दापोली), राधिका कृष्णा बेणेरे (६२, मुरुड, जि. दापोली), नारायण शंकर पवार (५३, मुरुड-दापोली) आणि चंद्रकांत लहू कुसगांवकर (६९, दाभोळ, दापोली) यांचा समावेश आहे.
चालकाचा ताबा सुटला
चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने बस कलंडली. यात एसटीतील २५ प्रवासी जखमी झाले. त्यांना महाड येथील ग्रामीण रु ग्णालयात दाखल करण्यात आले. १६ जखमींवर उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.