परभणी जिल्ह्यात ३० कोटींची उलाढाल ठप्प
By Admin | Published: March 15, 2016 12:56 AM2016-03-15T00:56:47+5:302016-03-15T00:56:47+5:30
परभणी : सराफा व्यापाऱ्यांच्या आंदोलनाचा आज १४ वा दिवस असून अद्यापही तोडगा निघालेला नाही. या १४ दिवसांमध्ये जिल्ह्यातील सराफा व्यापाऱ्यांची सुमारे
- अमोल पाटील, खालापूर
मुंबईपासून जवळचा तालुका म्हणून गेल्या अनेक दशकांपासून उद्योगपतींचे खालापूर तालुक्यावर विशेष प्रेम आहे. यामुळे खालापूरमध्ये अनेक कारखाने सुरू झाले. यामुळे झपाट्याने खालापूरचा विकास झाला, मात्र प्रदूषणही विकासाबरोबर वाढत गेले. आज खालापूरमधील जल, वायू आणि ध्वनी प्रदूषणामुळे येथील ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. या प्रदूषणामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मात्र, याकडे प्रदूषण मंडळाचे दुर्लक्ष होत आहे.
तालुक्याच्या खोपोली शहरात तर प्रदूषणाने कहरच केला आहे. विहारी गावानजीक इंडिया स्टील कंपनीचे वायू प्रदूषण अजून आटोक्यात नाही. स्थानिकांनी अनेकदा याबाबत तक्र ारी करूनही कंपनीच्या बँक हमीच्या पलीकडे काहीच कारवाई केली नसल्याने मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होत आहे. तर जवळ केमिकल कारखान्यांचे सांडपाणी पाताळगंगा नदी सोडण्यात येण्याचे प्रकार अजूनही घडतात, त्याकडेही प्रदूषण मंडळाचे दुर्लक्ष होत आहे. मूळगाव गावक ऱ्यांनी अनेक निवेदने दिली, मात्र कारवाई केली या पलीकडे काहीच उत्तर मिळत नाही. तालुक्यात होणाड भागातील व्हिनससह अन्य कारखान्यांच्या जल, वायू, ध्वनी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. सुपीक जमिनी नापीक बनल्या आहेत, त्यातच बोअरवेल आणि विहिरींना दूषित पाणी तयार झाले आहे. ज्योती स्टीलच्या ध्वनी प्रदूषणाने तर स्थानिक विद्यार्थी हैराण झाले आहेत, त्यासाठी संघर्ष समिती लढा देत आहे. दरम्यान, फाटा येथे एशियन कलर कोटेड, सारसन अलाणा यांचे वायू तर भूषण स्टीलचे जल आणि वायू प्रदूषण ऐरणीवर आले आहे. भूषण स्टीलने तर नाल्याद्वारे थेट आपले रसायनमिश्रित सांडपाणी नाल्यात सोडल्याने स्थानिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
नारंगी येथे नव्याने आलेली एचपी इंटरनॅशनल या कंपनीतून दुर्गंधीयुक्त वायू बाहेर पडत असल्याने त्याचा नाहक त्रास कामगार आणि शेजारीच असणाऱ्या गावकऱ्यांना होत आहे. कंपनीत काम करणारा आदिवासी कामगार याला फप्फुसाचा आजार झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता.
परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम
तालुक्याच्या वेगवेगळ्या भागात प्रदूषणामुळे विविध आजारांनी लोक त्रस्त आहेत. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण अधिक आहे, तर प्राणी-पक्ष्यांनाही या प्रदूषणाचा फटका बसत आहे. वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक उपाय योजना के ल्या जात नसल्याने ही समस्या उदभवत आहे.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी असणाऱ्या सर्वच बंधनकारक नियमांची पायमल्ली होत आहे. संपूर्ण तालुक्यात मोठ्या प्रमाणात प्रदूषण सुरु आहे.
कंपनीकडून होणारे प्रदूषण घातक असल्याने तालुक्याच्या प्रदूषणाचे आॅडिट होणे गरजेचे आहे. दोषी कंपन्यांवर कडक कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.
निसर्ग अडचणीत
सततचे होणारे हवेचे प्रदूषण आणि जल प्रदूषण याचा अतिशय गंभीर परिणाम निसर्गावर होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. फळे, पिके आणि भाजीपाला, भातशेती या पिकांवर त्याचा खोलवर परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे.
पाताळगंगा नदी दूषित
अनेक कारखान्यांचे सांडपाणी थेट पाताळगंगा नदीत सोडण्यात येत असल्याने नदी प्रदूषित झाली आहे. याच नदीकिनारी विविध गावांच्या पाणीपुरवठा योजना आहेत. उद्भवण नदीलगत असल्याने दूषित पाणी प्यावे लागत आहे.
भूषण स्टीलवर कारवाईची मागणी
अलीकडेच भूषण स्टीलच्या माल उत्पादित भागातून रसायनमिश्रित सांडपाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नाल्यात येऊन ते घातक सांडपाणी थेट पाताळगंगा नदीत आणि गावाच्या सार्वजनिक तळ्यात गेल्याने प्रदूषणाचा मोठा प्रश्न गंभीर बनला होता. यावर स्थानिकांनी आवाज उठविल्यानंतर रस्त्यालगत असणारे गटार साफसफाई करण्याचे काम कंपनीकडून करण्यात आले,मात्र ज्या ठिकाणाहून पाणी बाहेर येते ते मात्र अजूनही तसेच आहे.
वरवरची मलमपट्टी केल्याने हा प्रश्न सुटणार नसून अजून गंभीर बनणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते अरु ण जाधव यांनी सांगितले आहे. प्रदूषणासाठी ठोस उपाय योजना गरजेची आहे.
प्रदूषण नियामक मंडळाने आपल्यावर कारवाई करू नये आणि यासाठी कंपनीकडून कायमच असे कृत्य करण्यात येत असल्याने भूषण स्टीलवर कडक कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी होत आहे.
खालापूर तालुक्यातील भूषण स्टील, खोपोली इंडिया स्टीलसहित अन्य कंपन्यांच्या प्रदूषणाबाबत आमच्याकडे तक्र ारी आल्या आहेत. आमच्या कार्यालयाकडून वेळोवेळी तपासणी करून संबंधितावर योग्य कार्यवाही सुरू आहे. कारणे दाखवा नोटीस, बँक हमी पत्र अशा कारवाई सुरु असून भूषण स्टीलबाबत स्थानिकांच्या तक्र ारीवर काम सुरूआहे. कोणालाही पाठीशी न घालता निसर्ग आणि जनतेच्या आरोग्याच्या बाबतीत कोणी गंभीर नसेल अशा प्रदूषण कंपन्यांवर कडक कारवाई करण्यात येईल.
- डॉ. अनंत हर्षवर्धन,
प्रादेशिक अधिकारी, कोकण भवन, प्रदूषण नियमन मंडळ