नव्या कल्पनांचा स्वीकार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 01:03 AM2018-01-18T01:03:31+5:302018-01-18T01:03:31+5:30

राज्यात आणि देशामधील बँकांमध्ये सध्याच्या काळात अनेक आव्हाने निर्माण होत असून याकरिता प्रत्येक बँकर्सने सक्षमपणे कार्यरत राहून नव्या आव्हानांचा सामना केला पाहिजे.

 Accept new ideas | नव्या कल्पनांचा स्वीकार करा

नव्या कल्पनांचा स्वीकार करा

Next

अलिबाग : राज्यात आणि देशामधील बँकांमध्ये सध्याच्या काळात अनेक आव्हाने निर्माण होत असून याकरिता प्रत्येक बँकर्सने सक्षमपणे कार्यरत राहून नव्या आव्हानांचा सामना केला पाहिजे. तसेच आधुनिक तंत्रज्ञान हा आपल्या विकासाचा पाया होण्याकरिता नव्या विचारांना आणि नव्या कल्पनांचा स्वीकार करणे आवश्यक आहे. बदलत्या जीवनशैलीला ग्रामीण भागामध्ये प्रभावीपणे नेण्याकरिता सहकारी बँका हाच आजच्या युगातील सर्वोत्तम पर्याय आहे आणि रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही याच दिशेने प्रवास करीत आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष डॉ.एम.एल.सुखदेवे यांनी रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या भेटीप्रसंगी व्यक्त केले.
यावेळी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या या वेबसाइटच्या नूतनीकरणाचे उद्घाटन डॉ. एम. एल. सुखदेवे यांच्या हस्ते करण्यात आले. या नव्या वेबसाइटमध्ये नव्या रु पात आणि नव्या ढंगात सर्व आधुनिक बाबींचा समावेश करण्यात आला आहे. यावेळी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आमदार जयंत पाटील, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक आणि बँकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला भेट देण्यासाठी खूप वेळा मनात इच्छा असून देखील येता आले नाही याची खंत व्यक्त करीत डॉ. एम. एल. सुखदेवे यांनी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यपद्धतीबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच बँकेच्या आयएसओ नामांकन, बँकेच्या कर्मचाºयांनी स्थापन केलेले १७ हजार पेक्षा अधिक बचतगट, ६० दिवसीय एनपीए आढावा पद्धत, कामगिरीप्रमाणे बोनस आणि पगारवाढ (केपीए), संस्थांचे सबलीकरण धोरण याविषयी बँकेचे कौतुक केले. राज्यातील इतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रगतीसाठी देखील रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सहयोग द्यावा, असे आवाहन डॉ. सुखदेवे यांनी यावेळी केले.
याप्रसंगी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस भेट दिल्याबद्दल आमदार जयंत पाटील यांनी एम. एल. सुखदेवे यांचे आभार व्यक्त केले तसेच राज्यातील सहकार क्षेत्र समृद्ध व्हावा याकरिता राज्य सहकारी बँक आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
यांनी एकत्रितपणे कार्य करणे अधिक महत्त्वाचे ठरेल, असे आमदार
पाटील यांनी यावेळी बोलताना नमूद केले.
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक यांनी याप्रसंगी बँकेविषयी माहिती उपस्थितांना दिली तसेच येणाºया काळात बँक करीत असलेल्या आधुनिक योजनेविषयी ज्यामध्ये इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग या संकल्पना स्पष्ट केल्या. यावेळी डॉ.सुखदेवे यांनी सर्व कर्मचाºयांशी संवाद साधून राज्यातील सहकार क्षेत्रामध्ये केलेल्या कार्याबद्दल रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कामकाजाचे कौतुक करून येणाºया काळात अधिक सक्षमपणे कार्यरत राहण्यासाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन केले. राज्यातील सहकारी संस्था या प्रामुख्याने लोकविकास व समृद्धीचे कारण म्हणून पुढे येतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त
केला.

Web Title:  Accept new ideas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.