शहरं
Join us  
Trending Stories
1
काही लोकांनी धोकेबाजी करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
2
“जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
3
महाराष्ट्रातील मुस्लिमांनी पुन्हा तोडले ओवेसींचे स्वप्न; MIM ला 1 टक्काही मते मिळाली नाही
4
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
5
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
6
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
7
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
8
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
9
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
10
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: नाना पटोलेंचा अखेर विजय; २०८ मतांनी भाजप उमेदवाराचा पराभव
12
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
15
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
16
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
17
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
18
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
19
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
20
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...

नव्या कल्पनांचा स्वीकार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 1:03 AM

राज्यात आणि देशामधील बँकांमध्ये सध्याच्या काळात अनेक आव्हाने निर्माण होत असून याकरिता प्रत्येक बँकर्सने सक्षमपणे कार्यरत राहून नव्या आव्हानांचा सामना केला पाहिजे.

अलिबाग : राज्यात आणि देशामधील बँकांमध्ये सध्याच्या काळात अनेक आव्हाने निर्माण होत असून याकरिता प्रत्येक बँकर्सने सक्षमपणे कार्यरत राहून नव्या आव्हानांचा सामना केला पाहिजे. तसेच आधुनिक तंत्रज्ञान हा आपल्या विकासाचा पाया होण्याकरिता नव्या विचारांना आणि नव्या कल्पनांचा स्वीकार करणे आवश्यक आहे. बदलत्या जीवनशैलीला ग्रामीण भागामध्ये प्रभावीपणे नेण्याकरिता सहकारी बँका हाच आजच्या युगातील सर्वोत्तम पर्याय आहे आणि रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही याच दिशेने प्रवास करीत आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष डॉ.एम.एल.सुखदेवे यांनी रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या भेटीप्रसंगी व्यक्त केले.यावेळी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या या वेबसाइटच्या नूतनीकरणाचे उद्घाटन डॉ. एम. एल. सुखदेवे यांच्या हस्ते करण्यात आले. या नव्या वेबसाइटमध्ये नव्या रु पात आणि नव्या ढंगात सर्व आधुनिक बाबींचा समावेश करण्यात आला आहे. यावेळी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आमदार जयंत पाटील, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक आणि बँकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला भेट देण्यासाठी खूप वेळा मनात इच्छा असून देखील येता आले नाही याची खंत व्यक्त करीत डॉ. एम. एल. सुखदेवे यांनी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यपद्धतीबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच बँकेच्या आयएसओ नामांकन, बँकेच्या कर्मचाºयांनी स्थापन केलेले १७ हजार पेक्षा अधिक बचतगट, ६० दिवसीय एनपीए आढावा पद्धत, कामगिरीप्रमाणे बोनस आणि पगारवाढ (केपीए), संस्थांचे सबलीकरण धोरण याविषयी बँकेचे कौतुक केले. राज्यातील इतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रगतीसाठी देखील रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सहयोग द्यावा, असे आवाहन डॉ. सुखदेवे यांनी यावेळी केले.याप्रसंगी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस भेट दिल्याबद्दल आमदार जयंत पाटील यांनी एम. एल. सुखदेवे यांचे आभार व्यक्त केले तसेच राज्यातील सहकार क्षेत्र समृद्ध व्हावा याकरिता राज्य सहकारी बँक आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकयांनी एकत्रितपणे कार्य करणे अधिक महत्त्वाचे ठरेल, असे आमदारपाटील यांनी यावेळी बोलताना नमूद केले.रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक यांनी याप्रसंगी बँकेविषयी माहिती उपस्थितांना दिली तसेच येणाºया काळात बँक करीत असलेल्या आधुनिक योजनेविषयी ज्यामध्ये इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग या संकल्पना स्पष्ट केल्या. यावेळी डॉ.सुखदेवे यांनी सर्व कर्मचाºयांशी संवाद साधून राज्यातील सहकार क्षेत्रामध्ये केलेल्या कार्याबद्दल रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कामकाजाचे कौतुक करून येणाºया काळात अधिक सक्षमपणे कार्यरत राहण्यासाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन केले. राज्यातील सहकारी संस्था या प्रामुख्याने लोकविकास व समृद्धीचे कारण म्हणून पुढे येतील, असा आशावाद त्यांनी व्यक्तकेला.