खोपोली : खोपोलीत बुधवारी झालेल्या चार वर्षांच्या चिमुरडीच्या अमानुष हत्येप्रकरणी पोलिसांनी मुलीच्या घराजवळच राहणाऱ्या एका २७ वर्षांच्या तरुणाला गुरुवारी अटक केली.मुलीच्या आईने अनैतिक संबंधांना नकार दिल्याने त्या रागातून सूड घेण्यासाठी या नराधमाने हे घृणास्पद कृत्य केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी गुरु वारी पत्रकार परिषदेत दिली.खोपोलीतील पटेलनगर भागात बुधवारी एका चार वर्षांच्या चिमुरडीचे मुंडके व धड वेगळे करून अमानुषपणे तिची हत्या करण्यात आली होती. हत्या झालेली चिमुरडी मंगळवार, १२ फेब्रुवारीपासून बेपत्ता होती. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, रायगडचे पो.नि. जे.एस. शेख, खोपोली पोलीस स्टेशनचे निरीक्षक हेगाजे यांनी तपास सुरू करून तरुणाला ताब्यात घेतले. तपासाच्या वेळी आरोपी वेगवेगळी माहिती देऊन दिशाभूल करीत होता; परंतु पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला.
चिमुरडीच्या हत्येप्रकरणी तरु णाला अटक; आईने अनैतिक संबंधांना नकार दिल्याने सूड
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 1:35 AM