पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर
By admin | Published: March 16, 2016 08:36 AM2016-03-16T08:36:11+5:302016-03-16T08:36:11+5:30
मुरुड नगर परिषदेच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगरसेविका नादिया नाखुदा या सलग सहा वेळा नगर परिषद जनरल सभेस गैरहजर राहिल्याने जिल्हाधिकारी रायगड
आगरदांडा/ मुरुड : मुरुड नगर परिषदेच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगरसेविका नादिया नाखुदा या सलग सहा वेळा नगर परिषद जनरल सभेस गैरहजर राहिल्याने जिल्हाधिकारी रायगड यांनी त्यांचे पद रद्द केले. पद रद्द होताच प्रभाग १ (ड) सर्वसाधारण स्त्री राखीव पोटनिवडणूक राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांनी जाहीर केली. त्यामुळे सहा महिन्यांसाठी अल्प कालावधीचा नगरसेवक कोण बनणार, याची उत्सुकता लागली आहे.
या पोटनिवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दणे व स्वीकारणे १७ मार्च ते २२ मार्च २०१६ असा ठेवण्यात आला आहे. नामनिर्देशन मागे घेणे अंतिम तारीख ४ एप्रिल असून, मतदान १७ एप्रिलला होणार आहे. तर मतमोजणी १८ एप्रिलला सकाळी १० वाजता संपन्न होणार आहे. अल्पावधी नगरसेवक कोण होणार, हे आता स्पष्ट होणार आहे. (वार्ताहर)