आगरदांडा/ मुरुड : मुरुड नगर परिषदेच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगरसेविका नादिया नाखुदा या सलग सहा वेळा नगर परिषद जनरल सभेस गैरहजर राहिल्याने जिल्हाधिकारी रायगड यांनी त्यांचे पद रद्द केले. पद रद्द होताच प्रभाग १ (ड) सर्वसाधारण स्त्री राखीव पोटनिवडणूक राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांनी जाहीर केली. त्यामुळे सहा महिन्यांसाठी अल्प कालावधीचा नगरसेवक कोण बनणार, याची उत्सुकता लागली आहे.या पोटनिवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दणे व स्वीकारणे १७ मार्च ते २२ मार्च २०१६ असा ठेवण्यात आला आहे. नामनिर्देशन मागे घेणे अंतिम तारीख ४ एप्रिल असून, मतदान १७ एप्रिलला होणार आहे. तर मतमोजणी १८ एप्रिलला सकाळी १० वाजता संपन्न होणार आहे. अल्पावधी नगरसेवक कोण होणार, हे आता स्पष्ट होणार आहे. (वार्ताहर)
पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर
By admin | Published: March 16, 2016 8:36 AM