वादळी पावसामुळे महाड, पोलादपूरमध्ये नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 02:59 AM2018-05-19T02:59:10+5:302018-05-19T02:59:10+5:30

तालुक्यात गुरुवारी सायंकाळी ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने कामथे विभागात विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह कामथे, पितळवाडी, कापडे, देवळे येथे जोरदार पावसाच्या सरी पडल्या.

Damage to Mahad and Poladpur due to windy rain | वादळी पावसामुळे महाड, पोलादपूरमध्ये नुकसान

वादळी पावसामुळे महाड, पोलादपूरमध्ये नुकसान

Next

पोलादपूर : तालुक्यात गुरुवारी सायंकाळी ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने कामथे विभागात विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह कामथे, पितळवाडी, कापडे, देवळे येथे जोरदार पावसाच्या सरी पडल्या. हापूस आंबा, चिकूसह फणस, रानमेवा या पिकावर पावसाचा फटका बसण्याची शक्यता दिसून येत आहे. तालुक्यातील अनेक गावांसह शहरी भागात सायंकाळी ७ वाजता पावसाला सुरुवात झाली. मात्र पावसाळ्यापूर्वीच्या साफसफाईला सुरुवात न केल्याने ठिकठिकाणी रस्त्यावर कचऱ्यासह पाणी साचले.
पावसामुळे हवेतील उष्णता कमी होऊन गारवा निर्माण झाल्याने गेले अनेक दिवस उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र गुरांची पेंड, सरपणाची फाटी आदी कामांची आवराआवर करताना शेतकºयांची भंबेरी उडाली. यातच परिसरातील वीज गायब झाली होती. कशेडी घाट परिसरात पावसाने ढगांच्या गडगडाटासह विजेच्या सुरात वाºयासह पावसाने झोडपून काढले. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी वर्गाची तारांबळ उडाली असून हाती आलेले पीक वाया जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अवेळी आलेल्या पावसामुळे झाडे विद्युत तारांवर कोसळल्याने कोंढवी विभागाचा विद्युत पुरवठा रात्रभर बंद होता. पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाºया साफसफाईला सुरुवात न झाल्याने या पावसाळ्यात रस्त्यालगतच्या गटारातून कचºयासह पाणी रस्त्यावर साचल्याचे चित्र दिसून आले. या वर्षी प्री कप वॉटर स्पर्धासह गाळमुक्त तलावासह धरण साफसफाई करण्यात येत आहे. यामुळे या वर्षी पावसाचे पाणी समतल चर सह बंधाºयामुळे पाणी साठवणीत वाढ होण्याची शक्यता दिसून येत आहे.
>ेउधाणाचे पाणी रस्त्यावर आल्याने वाहतूक दोन तास ठप्प
अलिबाग : तालुक्यातील खारेपाटातील शिरवली-माणकुळे या चार गावांना जोडणाºया महत्त्वाच्या रस्त्यावर गुरुवारी दुपारी २ वाजता उधाणाच्या भरतीचे खारे पाणी येवून ते दुपारी चार वाजेपर्यंत वेगाने वाहत राहिले. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. दळणवळणाकरिता या रस्त्यावर अवलंबून असणाºया बहिरीचापाडा, माणकुळे, नारंगीचा टेप आणि बंगलाबंदर या चार गावांतील ग्रामस्थांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते महेंद्र म्हात्रे यांनी दिली. शिरवली ते माणकुळे या रस्त्याच्या बाजूने संरक्षक भिंत आणि रस्त्याचे मजबुतीकरणाचे काम अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येत आहे, परंतु ते अत्यंत संथगतीने सुरु आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या दिरंगाईमुळे चारही गावांतील ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.
उन्हाळी सागरी उधाणास हा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली जातो तर पावसाळी दिवसांतील सागरी उधाणाच्या वेळी अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. चार गावांतील ग्रामस्थ आणि विशेष: माणकुळे हायस्कूलमध्ये येणाºया विद्यार्थ्यांकरिता ही परिस्थिती आपत्कालीन परिस्थिती ठरु शकते. परिणामी पावसाळ््यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने वेगाने पावसाळ््यापूर्वी रस्त्याच्या बाजूने संरक्षक भिंत आणि रस्त्याचे मजबुतीकरणाचे काम पूर्ण करावे अशी मागणी ग्रामस्थांची आहे.
>मोहोपाड्यात वीज वितरणकडून मान्सूनपूर्व कामे सुरू
मोहोपाडा : मोहोपाडा येथील वीज वितरणच्या हद्दीतील गावांत पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत राहावा, यासाठी मान्सूनपूर्व कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यानुसार वीजवाहिन्यांना अडथळा ठरणाºया झाडांच्या फांद्या छाटण्यात आल्या आहेत.
त्यामुळे वादळी पावसामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण कमी होईल. पाताळगंगा औद्योगिक क्षेत्र, दांड-रसायनी रस्ता, कामगार वसाहतीतील गावे या ठिकाणी रस्त्याच्या कडेला वीजवाहिन्यांवरील फांद्या तोडण्याचे काम सुरू असून, लवकरच इतर परिसरातील झाडांच्या फांद्या तोडण्यात येणार असल्याचे सहा. अभियंता किशोरकुमार पाटील यांनी सांगितले.
मोहोपाडा वीज वितरणकडून या वेळी आठ ट्रान्सफॉर्मरचे रॉड बदलण्यात आले आहेत. तसेच ट्रान्सफॉर्मर आॅइल गळतीवर उपाययोजना, एलटी कंडक्टर बदलणे, परिसरातील लोखंडी सडलेले पोल दीनदयाळ योजनेतून बदलण्याची कामे वीज वितरणकडून परिसरात जोमाने सुरू आहेत.
>वादळी पावसामुळे
महाडमध्ये नुकसान
महाड : शहरात गुरुवारी सायंकाळी अचानक झालेल्या वादळी पावसाचा महाड तालुक्यात खाडीपट्टा विभागाला मोठा फटका बसला. वादळात वलंग आदिवासी वाडीतील अनेक घरांची छपरे उडून गेली तर काही घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली. यामुळे आदिवासी बांधवांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. जुई येथील रस्त्याच्या लगतचे अनेक विद्युत खांब खाली कोसळल्यामुळे विजेच्या तारा तुटल्या. त्यामुळे परिसरातील गावांमध्ये रात्रभर वीजपुरवठा खंडित झाला होता. गुरुवारी सायंकाळी विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटात मुसळधार पावसाला सुरवात झाली. झालेल्या नुकसानीची महसूल विभागाकडून पाहणी करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. वादळात घरांचे नुकसान झालेल्या आदिवासी बांधवांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी वलंग ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राजन कुर्डुनकर यांनी तहसीलदारांकडे केली आहे.

Web Title: Damage to Mahad and Poladpur due to windy rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.