‘एमआयडीसी’विरोधात शेतकऱ्यांचा एल्गार, बंधाऱ्यांंच्या दुरुस्तीअभावी शहापूर-धेरंडमधील शेतीचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 08:35 PM2021-09-23T20:35:28+5:302021-09-23T20:35:28+5:30

Rajgad News: खाडीकिनारी असणाऱ्या बंधाऱ्यांची दुरुस्ती केली नसल्याने १५० शेतकऱ्यांचे हाती आलेले पीक देखील वाय जात असल्याने तीन वर्षांची दाेन काेटी ६४ लाख ७५ हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याची मागणी करत ‘एमआयडीसी’विरोधातील रोष आता कायदेशीर लढाईतून व्यक्त केला जाणार आहे.

Elgar of farmers against MIDC, damage to agriculture in Shahapur-Dherand due to lack of repair of dams | ‘एमआयडीसी’विरोधात शेतकऱ्यांचा एल्गार, बंधाऱ्यांंच्या दुरुस्तीअभावी शहापूर-धेरंडमधील शेतीचे नुकसान

‘एमआयडीसी’विरोधात शेतकऱ्यांचा एल्गार, बंधाऱ्यांंच्या दुरुस्तीअभावी शहापूर-धेरंडमधील शेतीचे नुकसान

Next

रायगड : अलिबाग तालुक्यातील शहापूर-धेरंडमधील जमिनी एमआयडीसीने संपादित केल्या आहेत. परंतु खाडीकिनारी असणाऱ्या बंधाऱ्यांची दुरुस्ती केली नसल्याने १५० शेतकऱ्यांचे हाती आलेले पीक देखील वाय जात असल्याने तीन वर्षांची दाेन काेटी ६४ लाख ७५ हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याची मागणी करत ‘एमआयडीसी’विरोधातील रोष आता कायदेशीर लढाईतून व्यक्त केला जाणार आहे.

अलिबाग तालुक्यातील शहापूर-धेरंडमधील ३८७.७७ इतके हरी-२ मध्ये मोडणारे क्षेत्र नगर रचना विभागाची विनापरवानगी संपादित करण्यात आले. ही सर्व जमीन खारभूमीचे उपजाऊ क्षेत्र आहे. पण गेल्या तीन वर्षांपासून मोठे शहापूर पूर्व भागातील खार बंधिस्थीजवळ ५० मीटर लांबीचे व २० मीटर खोली असलेले भगदाड पडले आहे. त्यामुळे २५ जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान येथील संरक्षण बांध फुटून हाताताेंडाशी आलेले भात पिकामध्ये खारे पाणी घुसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तसेच भातशेतीचे पूर्व मशागतीचा खर्च, उत्पादनातील घट आणि रोजगार बुडाल्यामुळे तीन वर्षांत जवळपास दाेन काेटी ६४ लाख ७५ हजार रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांचे झाले असल्याने एमआयडीसीने शहापूर-धेरंड परिसरातील १५० शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाच्यामार्फत शेतकऱ्यांनी केली आहे.

३५० खार बंधारे दुर्लक्षितच
या भागातील शेती, गावे उच्चतम भरती रेषेच्या दाेन मीटर खाली आहेत. या क्षेत्राचे संरक्षण गेली ३५० वर्षे खार बंधारे करीत आहेत. येथील जमिनी एमआयडीसीने २००९ साली संपादित केल्यानंतर या खार बंधाऱ्यांची दुरुस्ती आणि नूतनीकरण याची जबाबदारी एमआयडीसीकडे आहे. हे समजावून देण्यासाठी शेतकऱ्यांना एमआयडीसीच्या अंधेरी येथील मुख्यालयाजवळ दोन वेळा आंदोलने केली आहेत.

आश्वासनांवरच बोळवण
२३ नाेव्हेबर २०१९ रोजी श्रमिक मुक्ती दल आणि सहायक मुख्य कार्यकरी अधिकारी अविनाश सुबेदार यांच्या दालनात बैठक झाली. सदर बैठकीत संपादनाशी निगडित बांधाची जबाबदारी एमआयडीसीने घेण्याचे इतिवृत्तातील मुद्दा क्रमाक पाचमध्ये मान्य केले. परंतु तात्पुरत्या दुरुस्तीपलीकडे आजतागायत काहीही झालेले नाही.

सामाजिक चळवळीची जन्मभूमी
या जमिनीत सरखेल कान्होजी आंग्रे, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, दिवंगत ना. ना. पाटील, दिवंगत तांडेल, जागतिक कीर्तीच्या विचारवंत डॉ. गेल ओम्व्हेट, श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या विचारांची आणि संघर्षाची बीज या मातीत दडली आहेत.

 एमआयडीसीने जमीन संपादित केल्यानंतर बांध बंधिस्थी सुस्थितीत ठेवण्याचे, त्याची दुरुस्ती करण्याचे मान्य केलेले आहे. असे असताना आता टाळाटाळ होत असल्याने त्यांची शिक्षा शेतकऱ्यांना भाेगावी लागत आहे. त्यामुळे आमचा हक्क मिळेपर्यंत कायदेशीर आणि शांततेच्या मार्गाने लढा सुरूच राहणार आहे.
- राजन भगत, श्रमिक मुक्ती दल

Web Title: Elgar of farmers against MIDC, damage to agriculture in Shahapur-Dherand due to lack of repair of dams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड