तिसऱ्या दिवशीही आभाळ फाटलेलेच, रायगडमध्ये पूरसदृश्य परिस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2020 03:26 AM2020-08-07T03:26:56+5:302020-08-07T03:27:17+5:30

रायगडमध्ये पूरसदृश्य परिस्थिती । जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत। पनवेलमध्ये १० तास वीजपुरवठा खंडित

Even on the third day, the sky was clear | तिसऱ्या दिवशीही आभाळ फाटलेलेच, रायगडमध्ये पूरसदृश्य परिस्थिती

तिसऱ्या दिवशीही आभाळ फाटलेलेच, रायगडमध्ये पूरसदृश्य परिस्थिती

Next

अलिबाग : प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या पूर्व सूचनांनुसार, ५ ते ७ आॅगस्ट या कालावधीत रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून नदीकिनाºयावरील व सखल परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरडग्रस्त, सखल भागातील नागरिकांनी योग्य वेळी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

गेल्या तीन दिवसांपासून रायगडमध्ये सलग मुसळधार पाऊस पडतो आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नद्यांनी अक राळ-विक राळ रूप धारण करीत, पात्र सोडल्याने महाड, माणगाव, रोहा, नागोठणेमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून नागरिकांना काही महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील नदीच्या आसपासच्या व सखल परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. अतिवृष्टी होत असल्याने दरडग्रस्त, सखल भागातील नागरिकांनी योग्य वेळी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे. समुद्र खवळलेला असल्याने मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये; तसेच बीचवर फिरण्यासाठी जाऊ नये. आवश्यक असल्यासच घराबाहेर पडावे. अतिधाडसाने पुराच्या पाण्यातून वाहने चालवू नयेत.
विद्युत खांब, स्विच बोर्ड, वीजवाहिन्या यांना हात लावू नये, यापासून दूर राहावे. महत्त्वाची कागदपत्रे, औषधे, जीवनावश्यक वस्तू सुरक्षित ठेवाव्यात. सोबत बॅटरी, ड्राय फूड (जसे फरसाण, चिवडा, पोहा, मुरमुरे इ.), फळे आवश्यक प्रमाणात सोबत ठेवावीत. नदीचे प्रवाह, धबधबे, तलाव आदी पाण्याच्या ठिकाणी तरुणांनी पोहण्यास जाऊ नये. शेतामध्ये जाताना नदी, नाला, ओढ्यातील पाण्याचा प्रवाह ओलांडताना पाणीपातळीचा अंदाज घेऊनच पुढे जावे. वेगाने पाणी
वाहत असल्यास प्रवाहामध्ये उतरू
नये.
स्थानिक प्रशासनाने स्थलांतराच्या सूचना दिलेल्या असल्यास त्यांना सहकार्य करून नातेवाईक अथवा सार्वजनिक ठिकाणी स्थलांतरित व्हावे. स्थानिक प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांना सहकार्य करावे, त्यांच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. नागरिकांनी घाबरून न जाता स्थानिक प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.

आपत्कालीन प्रसंगी संपर्क साधा : आपत्कालीन प्रसंगी जवळचे तहसीलदार कार्यालय किंवा पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षास ०२१४१-२२२११८ / ८२७५१५२३६३ किंवा पोलीस विभागाच्या नियंत्रण कक्षास ०२१४१-२२८४७३ / ७४४७७११११० या क्र मांकांवर संपर्क साधावा.

पोहण्यासाठी गेलेला युवक बेपत्ता
1म्हसळा : शहरासह संपूर्ण तालुक्यात पावसाचा तडाखा कायम असून बुधवारी संततधार पावसामध्ये शहरातील जानसई नदीने रुद्रावतार धारण केला आहे. नदीने धोक्याची पातळी ओलांडली असताना एक २३ वर्षीय युवक पोहण्यासाठी गेला असता बेपत्ता झाला. त्या युवकाचा शोध सुरू आहे.
2मागील चार दिवसांपासून म्हसळा शहरासहित तालुक्यात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे तालुक्यातील नद्या व खाडीलगत असणाºया गावांमध्ये पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. म्हसळा शहरातील जानसई नदीने रुद्रावतार धारण केला असल्याने शहरातदेखील पुराचे पाणी शिरले असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे.
3जानसई नदीवर असणाºया शहरातील पाभरा पुलावर काही युवक पोहण्यासाठी गेले होते. नदीवर असणाºया उंच पुलावरून थेट नदीत हे युवक पोहण्यासाठी उड्या मारत होते. या युवकांमध्ये बदर अब्दुल्ला हळदे या २३ वर्षीय युवकाने नदीत उडी मारल्यानंतर तो वाहून गेला. या युवकाचा शोध रेस्क्यू टीमकडून सुरू असून अद्याप तो बेपत्ता आहे.

रायगडमध्ये चोवीस तासांत
३ हजार ३४४.८० मिमी पाऊस
च्अलिबाग : गेल्या मंगळवारपासून रायगड जिल्ह्यात पाऊस सैराट झाला आहे. जागोजगी पाणी साचले आहे. तर उधाणाचे पाणी काही नागरिकांच्या घरात शिरले आहे. त्यामुळे जिल्हावासी देवाचे नामस्मरण करीत होते. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत ३ हजार ३४४.८० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. २०९.०५ मि.मी. सरासरीने पर्जन्यमान नोंदविले गेले आहे. उरण आणि रोहा तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडला आहे.
च्अलिबाग तालुक्यात १८७ मि.मी., पेण २२० मि.मी., मुरु ड २११ मि.मी., पनवेल २१७ मि.मी., उरण ३२३ मि.मी., कर्जत १०७.६० मि.मी., खालापूर ९०.९० मि.मी., माणगांव २२ मि.मी., रोहा ३०४ मि.मी., सुधागड २११ मि.मी., तळा २३७ मि.मी., महाड १८१ मि.मी., पोलादपूर १८२ मि.मी., म्हसळा २०० मि.मी., श्रीवर्धन २३८ मि.मी., माथेरान २१४.२० मि.मी. असा एकूण ३ हजार ३४४.८० मि.मी. पाऊस नोंदवला गेला आहे.

पोलादपूर येथे सावित्री नदीने ओलांडली धोक्याची पातळी
च्पोलादपूर : गेल्या दोन दिवसांपासून अविश्रांत मुसळधार कोसळणाºया पावसाने रौद्र रूप धारण केले आहे. तर उत्तर वाहिनी सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्क तेचा इशारा दिला आहे. प्रशासन सतर्क झाले असून पोलादपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव टीमसह, नायब तहसीलदार समीर देसाई टीमसह रात्री उशिरापर्यंत शहरातील परिस्थितीची पाहणी करीत होते.

नागरिकांना पोलिसांचे आवाहन

माणगावजवळील काळ नदीवरील कळमजे हा मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे. पाली ते वाकण जाणाºया मार्गावरील आंबा नदीवरील पूल, रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये बोर्ली मांडला ते महाळुंगे काकळघर हा मार्ग वाहतुकीसाठी सुरू केला आहे. वावे ते रामराज जाणारा मार्गदेखील वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे. सध्या जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नद्यांच्या पाणीपातळीमध्ये वाढ होत आहे, त्यामुळे कोणीही अशा पाण्याच्या प्रवाहात जाऊ नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Web Title: Even on the third day, the sky was clear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.