ग्रामपंचायत निवडणुकीत ४,२७८ उमेदवार रिंगणात , सरपंचपदासाठी ८२२ अर्ज वैध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 02:07 AM2017-10-07T02:07:33+5:302017-10-07T02:07:36+5:30

रायगड जिल्ह्यातील २४२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतून ७८८ उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता रिंगणामध्ये ४ हजार २७८ उमेदवार उरले आहेत.

In the Gram Panchayat elections, 4,278 candidates in the fray, 822 for Sarpanch post valid | ग्रामपंचायत निवडणुकीत ४,२७८ उमेदवार रिंगणात , सरपंचपदासाठी ८२२ अर्ज वैध

ग्रामपंचायत निवडणुकीत ४,२७८ उमेदवार रिंगणात , सरपंचपदासाठी ८२२ अर्ज वैध

Next

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील २४२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतून ७८८ उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता रिंगणामध्ये ४ हजार २७८ उमेदवार उरले आहेत. यामध्ये उरण, सुधागड आणि महाड तालुक्यातील ग्रामपंचायतींचा आकडा उशिरापर्यंत उपलब्ध झाला नव्हता.
सरपंचपदासाठी ८२२ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले होते. त्यातील १८१ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले, तर ४ हजार २४४ सदस्यपदांसाठी अर्ज वैध ठरले. त्यातील ६०७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे.
१६ आॅक्टोबर रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे, तर १७ आॅक्टोबरला मत मोजणी करून निकाल जाहीर केले जाणार आहेत. प्रशासनाच्या दिरंगाईचा फटका निकालाच्या दिवशीपण लागणार का? असा सवाल त्यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. २२ ते २९ सप्टेंबर २०१७ या कालावधीत ४ हजार २२८ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. ३ आॅक्टोबर रोजी अर्जाची छाननी करण्यात आली होती. त्यामध्ये ३६ अर्ज बाद झाल्याने ४ हजार २५२ अर्ज वैध ठरले होते.
गुरुवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती. मात्र, किती उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले, याचा आकडा जिल्हा निवडणूक विभागाकडे उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. संबंधित तहसीलदारांनी रात्री उशिरापर्यंत माहिती संकलित करून जिल्हा निवडणूक विभागाला दिलेली
नव्हती.

निवडणूक होणाºया ग्रामपंचायती
अलिबाग-६, पेण-२६, उरण-१८, मुरु ड-५, पनवेल-११, कर्जत-७, खालापूर-१४, माणगाव-१९, तळा-१, रोहे-५, सुधागड-१४, महाड-७३, श्रीवर्धन-१४, पोलादपूर-१६, म्हसळा-१३ एकूण-२४२
 

Web Title: In the Gram Panchayat elections, 4,278 candidates in the fray, 822 for Sarpanch post valid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.