मोहोपाडा : चांभार्ली गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगत असलेल्या अनधिकृतइमारतीचे बांधकाम वनविभागाने तोडले. या कारवाईसाठी वनविभागाच्या अधिकाºयांना चांभार्ली ग्रामस्थांनी विरोध के ला. मात्र पोलीस बंदोबस्तात इमारत जमीनदोस्त करण्यात आली.
चांभार्ली येथे एका इमारतीचे काही बांधकाम हे वनविभागाच्या सर्वे नंबर १०१/१ मध्ये अनधिकृतपणे केलेले होते. या इमारतीचा भाग रिकामा करण्यासाठी वनविभागामार्फत इमारतीचे मालक राम मुंढे यांना नोटीस बजावण्यात आली होती. परंतु नोटीस देऊनही इमारत खाली न केल्याने वनविभागाने पोलीस बंदोबस्तात इमारतीचे बांधकाम पाडण्यासाठी सज्ज झाले. यावेळी चांभार्ली येथील ग्रामस्थ रस्त्यावर ठाण मांडून बसले होते. त्यांनी पोकलन रोखत, आमच्या अंगावरून न्या नंतरच इमारतीचे बांधकाम पाडण्यास सुरु वात करा असे ग्रामस्थांनी भूमिका घेत विरोध के ला. यावेळी ग्रामस्थ महिला व महिला पोलीस शिपाई यांच्यात बाचाबाची झाली यावेळी पोलिसांना नाईलाजास्तव लाठीचार्ज करावा लागला.पोलिसांची भूमिका महत्त्वाचीच्पोलिसांनी महत्त्वाची भूमिका बजावत समजूत काढली. पोकलनच्या साहाय्याने इमारतीचे बांधकाम तोडले. वनविभागाचे अधिकारी, पोलीस कर्मचारी, दंगल नियंत्रण पथकाचे जवान उपस्थित होते.