शोभायात्रेतून उलगडला इतिहास

By admin | Published: December 17, 2015 11:19 PM2015-12-17T23:19:17+5:302015-12-17T23:19:17+5:30

नगरपरिषदेला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गुरुवारपासून शतकोत्तर सुवर्ण वर्षपूर्तीच्या कार्यक्रमास आरंभ होत आहे. यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन नगरपरिषदेने केले होते.

History from the glory of the glory | शोभायात्रेतून उलगडला इतिहास

शोभायात्रेतून उलगडला इतिहास

Next

पेण : नगरपरिषदेला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गुरुवारपासून शतकोत्तर सुवर्ण वर्षपूर्तीच्या कार्यक्रमास आरंभ होत आहे. यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन नगरपरिषदेने केले होते. यावेळी १८ चित्ररथांतून पेण नगरीचा देदीप्यमान इतिहास शोभायात्रेतून उलगडला गेला. राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन या शोभायात्रेतून झाले.
गुरुवारी सकाळी श्री गणेश पूजन व श्री सत्यनारायण महापूजेने शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. दुपारी ४,५०० ते ५,००० शालेय विद्यार्थी, शिक्षक, पेण नगरीच्या सर्व क्षेत्रातील आघाडीचे मान्यवर, पेणचे माजी मंत्री रवींद्र पाटील, पेण नगराध्यक्ष प्रीतम पाटील, गटनेते रवींद्र पाटील, पेण नगर प्रशासनाचे मुख्याधिकारी जीवन पाटील, विषय समित्यांचे सभापती नगरसेवक , नपा शिक्षण मंडळ, पेण सुमती देव प्रशाला, गुरुकुल प्रशाला, पेण प्रायव्हेट हायस्कूल, कारमेल इंग्रजी माध्यम प्रशाला, मदर तेरेसा इंग्रजी माध्यम प्रशाला, पेण नगर प्रशासनाच्या प्राथमिक प्रशाला, म.ना. नेने कन्या प्रशाला, कोएसो संस्थेच्या मराठी व इंग्रजी माध्यमाच्या प्रशाला या पेण नगरीच्या शिक्षण जगताच्या सर्व संस्था व प्रशाला, शिक्षक, विद्यार्थ्यांनी शोभायात्रेत सहभाग घेतला. यावेळी पेण नगरीच्या शैक्षणिक, आर्थिक, सेवाभावी, क्रांतिकारकांचे पुण्यस्मरण, आधुनिक जगताशी स्पर्धा करणारे, बारा बलुतेदारांचे व्यवसाय, संतांच्या दिंड्या व स्त्री सक्षमीकरण अशा तब्बल १८ विषयांना स्पर्श १८ चित्ररथातून सादर केला. विद्यार्थ्यांनी समाजाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे घोषवाक्य फलक, ढोल ताशांचा गजर व नव्या वाटचालीच्या पदपथाला स्पर्श करणारी पेण नगरीच्या शतकोत्तरी सुवर्णमहोत्सवाचा सळसळता उत्साह या शोभायात्रेतून पहावयास मिळाला. पेणकरांनी शोभायात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Web Title: History from the glory of the glory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.