Maharashtra Election 2019: दहिसरचे पार्सल परत पाठवा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 12:22 AM2019-10-18T00:22:30+5:302019-10-18T00:22:39+5:30

Maharashtra Election 2019: सुनील तटकरे यांचा विरोधकांवर निशाणा : माणगाव येथे सभा

Maharashtra Election 2019: Return parcel of Dahisar | Maharashtra Election 2019: दहिसरचे पार्सल परत पाठवा

Maharashtra Election 2019: दहिसरचे पार्सल परत पाठवा

Next

अलिबाग : लोकसभेच्या निवडणुकी वेळी उद्धव ठाकरेंनी विलेपार्लेवरून पार्सल पाठवले होते, त्यांना सुखरूप मान सन्मानाने रायगडच्या जनतेने मोठ्या मताधिक्याने पराभूत करून परत पाठवले. आता पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीत ठाकरेंनी दहिसरचे पार्सल श्रीवर्धनला पाठवले आहे, त्यांनाही परत पाठवण्याचे काम आम्ही करणार आहोत, असा घणाघाती हल्ला खासदार सुनील तटकरे यांनी शिवसेनेचे उमेदवार विनोद घोसाळकर यांच्यावर चढवला.
माणगाव येथे श्रीवर्धन मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेवार अदिती तटकरे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत खासदार तटकरे बोलत होते.

ऑनलाइन ऑर्डर करून आलेले पार्सल नेहमी खरे नसते, कधी कधी त्यात दगड पण येतात. असेच पार्सल या वेळी आले आहे, त्यामुळे त्याचा स्वीकार न करता परत पाठवण्याचे काम या निवडणुकीत करायचे आहे, असे आवाहन केले. त्यांनी माणगाव तालुक्यातील लोणशी गणातील होडगाव कोंड, उणेगाव, लोणशी मोहल्ला, साई, मोर्बा, खरवली भागात ग्रामस्थांसह संवाद साधला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार तटकरेंनी आघाडीच्या उमेदवार अदिती तटकरे या येथील स्थानिक आहेत. त्या सहजरीत्या लोकांना भेटण्यासाठी उपलब्ध असतात. जिल्हा परिषद अध्यक्षा म्हणून त्यांनी सर्व धर्माच्या लोकांना सोबत घेत या भागात अनेक विकासकामे केली आहेत, असे सांगितले. या वेळी प्रदेश चिटणीस इकबाल धनसे, तालुकाध्यक्ष सुभाष केकाणे, पं. स. सदस्या अलका केकाणे, राजू मोरे, शेकापचे रमेश मोरे, असलम राऊत, युवकचे संतोष दसावते आदी उपस्थित होते.

Web Title: Maharashtra Election 2019: Return parcel of Dahisar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.