दासगाव : जन्म-मृत्यू, विवाह यासह सर्वच आवश्यक दाखले महसूल विभागाच्या तलाठ्यांमार्फत दिले जातात. हे दाखले कोणत्या नियमाच्या आधारे दिले, याबाबत कोणाला कोणतीच माहिती नसते. उच्च पदस्थ अधिकाºयांनी याबाबतची माहिती जाहीर करावी, अशा मागणीचा आग्रह धरत तलाठी संघटनेने आंदोलन पुकारले आहे.ग्रामीण आणि शहरी जीवनाचा महसूल विभागातील तलाठी हा महत्त्वपूर्ण भाग आहे. जन्म, मृत्यू, वारस दाखले, वंशावळ, भूमिहीन, शेतमजूर, विधवा, परित्यक्त्या, जमिनीच्या चतु:सीमा यासह असंख्य दाखले तलाठ्यांमार्फत दिले जातात. या दाखल्यावर सर्वच कामे अगदी सहजगत्या होतात. मात्र एखादा दाखला का दिला जो देण्यासाठी कायद्याचा आधार काय असा युक्तिवाद केला जातो. त्या वेळी सर्वच जण अनुत्तरित असतात. महसूल विभागामार्फत देण्यात येणारे हे दाखले आणि दाखले देण्यासाठीचा नियम याबाबतचा सविस्तर अशी माहिती कोणाकडे उपलब्ध नाही. शासनानेही माहिती उपलब्ध करून द्यावी, असा आग्रह धरत तलाठी संघटनेने दाखले देणे बंद आंदोलन पुकारले आहे.२ आॅक्टोबरपासून तलाठ्यांच्या या आंदोलनाला प्रारंभ झाला आहे. वेगवेगळ्या ३६ प्रकारच्या या दाखल्यांची यादी करत हे दाखले देण्याचे बंद करण्याचा निर्णय महाराष्टÑ राज्य तलाठी संघाने घेतला आहे. या आंदोलनामुळे सर्वसामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागणार असून, हे आंदोलन जनहितार्थ असल्याचे सांगत लोकांनी तलाठी संघटनांना सहकार्य करावे, असे आवाहन संघटनेमार्फत केले आहे.
दाखल्यांबाबत स्पष्टीकरणासाठी तलाठी संघटनेचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2017 2:05 AM