मुरुडमध्ये १०२ उमेदवारी अर्ज दाखल; सदस्यपदासाठी ९० जण इच्छूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 11:56 PM2019-02-09T23:56:39+5:302019-02-09T23:56:51+5:30
मुरु ड तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीच्या निवडणुका संपन्न होत असून शनिवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तीनही ग्रामपंचायतींमधून सरपंचपदासाठी १२ अर्ज तर ग्रामपंचायत सदस्यासाठी ९० उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती मुरुड तहसील कार्यालयाकडून देण्यात आली.
मुरु ड जंजिरा : मुरु ड तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीच्या निवडणुका संपन्न होत असून शनिवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तीनही ग्रामपंचायतींमधून सरपंचपदासाठी १२ अर्ज तर ग्रामपंचायत सदस्यासाठी ९० उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती मुरुड तहसील कार्यालयाकडून देण्यात आली. शेवटचा दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची मोठी गर्दी मुरुड तहसील कार्यालयात पाहावयास मिळाली.
आंबोली ग्रामपंचायतमधून थेट सरपंचपदासाठी आंबोली ग्रामविकास आघाडीकडून शिल्पा मोकल यांनी अर्ज दाखल केला आहे. तर शिवसेनेनकडून कोमल माळी, आदिशा भोईर, रु चिता माळी यांचे अर्ज दाखल झाले आहेत. या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्यासाठी प्रभाग एक मधून ६ अर्ज, प्रभाग दोन मधून ८ तर प्रभाग तीनमधून ६ अर्ज दाखल झाले आहेत.
मजगाव ग्रामपंचायतमध्ये शिवसेना व काँग्रेस पक्षाची युती झाली आहे. येथे सरपंचपदासाठी ३ उमेदवार उभे ठाकले आहेत. तर भारतीय जनता पार्टी स्वबळावर निवडणूक लढवत आहे. ग्रामपंचायत सदस्यासाठी २९ अर्ज दाखल झाले आहेत. इथे राष्ट्रवादी व शेकाप यांच्यात युती झाली आहे.
उसरोलीत सरपंचपदासाठी ६ तर सदस्यासाठी ४१ अर्ज दाखल झाले. भारतीय जनता पार्टीकडून सरपंचपदासाठी समीर शिंदे यांनी अर्ज दाखल केला आहे. उसरोलीत वाळवंटी मधील प्रभाग ४ (अ)मधून यशवंत पाटील हे शेकापचे उमेदवार आहेत.
कर्जतमध्ये ३६८ उमेदवारी अर्ज दाखल
कर्जत : कर्जत तालुक्यातील आठ ग्रामपंचायतीच्या निवडणुका रविवार २४ फेब्रुवारी रोजी जाहीर झाल्या आहेत. शनिवारी एकूण ३६८ नामनिर्देशपत्र दाखल झाली आहेत. त्या मध्ये सरपंच पदासाठी ४८ तर सदस्यपदासाठी ३२० अशी दोन्ही मिळून ३६८ नामनिर्देशपत्र दाखल झाली आहेत. १३ फेब्रुवारी रोजी नामनिर्देशपत्र मागे घेण्याची मुदत जाहीर करण्यात आली आहे.
मार्च २०१९ मध्ये आठ ग्रामपंचातीची मुदत संपत आहे. तालुक्यातील भालीवडी, हालीवली, ममदापूर, पळसदरी, खांडपे, चिंचवली, किरवली, सावेळे या ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. भालीवडीत सदस्यपदासाठी ३३ तर सरपंचपदासाठी ५, हालीवलीमध्ये सदस्यपदासाठी २४ तर सरपंचपदासाठी ४ अर्ज दाखल करण्यात आलेत.
ममदापूरमध्ये सदस्य पदासाठी ३६ तर सरपंचपदासाठी ४, पळसदरीत सदस्य पदासाठी २७ तर सरपंचपदासाठी १४, खांडपेत सदस्य पदासाठी ६१ तर सरपंचपदासाठी ८, चिंचवलीत सदस्य पदासाठी ३८ तर सरपंचपदासाठी ५, किरवलीत सदस्य पदासाठी ५१ तर सरपंचपदासाठी ५, सावेळेत सदस्य पदासाठी ५० तर सरपंचपदासाठी ३ अर्ज आले आहेत.