कुंभार समाज आज धडकणार विधानभवनावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 07:28 AM2018-03-05T07:28:51+5:302018-03-05T07:28:51+5:30
महाराष्ट्र कुंभार समाज महासंघ (रजि.) यांच्या नेतृत्वाखाली कुंभार समाजाच्या विविध मागण्यांसाठी विधानभवनावर ५ मार्च रोजी भव्य मोर्चा निघणार असून, त्या निमित्ताने जनजागृती व वातावरण निर्मितीसाठी म्हसळा तालुका कुंभार समाजाच्या वतीने समाजाचे अध्यक्ष सुनील अंजर्लेकर यांच्या नेतृत्वाखाली म्हसळा कुंभारआळी समाजमंदिर ते संपूर्ण म्हसळा शहर जनजागृती मोर्चा काढण्यात आला.
म्हसळा - महाराष्ट्र कुंभार समाज महासंघ (रजि.) यांच्या नेतृत्वाखाली कुंभार समाजाच्या विविध मागण्यांसाठी विधानभवनावर ५ मार्च रोजी भव्य मोर्चा निघणार असून, त्या निमित्ताने जनजागृती व वातावरण निर्मितीसाठी म्हसळा तालुका कुंभार समाजाच्या वतीने समाजाचे अध्यक्ष सुनील अंजर्लेकर यांच्या नेतृत्वाखाली म्हसळा कुंभारआळी समाजमंदिर ते संपूर्ण म्हसळा शहर जनजागृती मोर्चा काढण्यात आला.
प्रमुख मागण्यांमध्ये कुंभार समाजासाठी संत गोरोबाकाका माती कला बोर्डची स्थापना करणे, कुंभार समाजाचा एन.टी.मध्ये समावेश व्हावा, उस्मानाबाद जिल्ह्यातील संत गोरोबाकाका यांचे जन्मस्थान तेर ढोकी या तीर्थक्षेत्रास ‘अ’ दर्जा मिळावा, कुंभार समाजास विधान परिषदेत प्रतिनिधत्व मिळावे, मातीवर आकारली जाणारी रॉयल्टी संपूर्णपणे माफ करावी, माती वाहतूक व वीटभट्टी परवान्याच्या जाचक अटी रद्द करण्यात येऊन कुंभार समाजास ओळखपत्रावर परवाना मिळावा, कुंभार समाजासाठी राखीव असणाºया कुंभार खाणीवरील अतिक्र मणे दूर करावीत, समाजासाठी विटा, मूर्ती, मडकी आदी माल विक्रीसाठी ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका हद्दीत अग्रक्रमाने जागा उपलब्ध करून द्याव्यात, मालाच्या उत्पादनासाठी शासकीय जागा उपलब्ध करून द्याव्यात, समाजातील ६० वर्षांवरील कारागिरास मानधन मिळावे, समाजातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र वसतिगृहाची उभारणी करावी, अशा विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधण्यात येणार असल्याचे समाजाचे अध्यक्ष सुनील अंजर्लेकर यांनी सांगितले. याप्रसंगी नगराध्यक्षा कविता बोरकर, श्रीवर्धन म्हसळा कुंभार समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रवीण शिरकर, उपाध्यक्ष अनंत पालकर, सचिव गणेश इवलेकर, रायगड जिल्हा युवक कार्याध्यक्ष महेश करंजकर, पाभरे कुंभार समाज अध्यक्ष जनार्दन गोविलकर आदी मान्यवर उपस्थित होते. ५ मार्च रोजी विधानभवनावर काढण्यात येणाºया या महामोर्चात श्रीवर्धन-म्हसळा तालुक्यातील जास्तीत जास्त समाजबांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन रायगड जिल्हा कुंभार समाज खजिनदार सुनील अंजर्लेकर यांनी केले.