रसायनी रेल्वे स्थानकात समस्या; सुविधांची वानवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 11:18 PM2019-09-10T23:18:15+5:302019-09-10T23:18:24+5:30

निवारा शेड नसल्याचे पावसामुळे प्रवाशांचे हाल

Problems with the chemical train station; Create features | रसायनी रेल्वे स्थानकात समस्या; सुविधांची वानवा

रसायनी रेल्वे स्थानकात समस्या; सुविधांची वानवा

googlenewsNext

मोहोपाडा : रसायनी पाताळगंगा हा औद्योगिकीकरणाने नटलेला परिसर असून येथे विविध उद्योगधंदे आहेत. परिसरात शासकीय कार्यालये, महाविद्यालय, सेबी प्रकल्प,जवळूनच गेलेला मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आदीमुळे रसायनी व परिसराचा नावलौकिक आहे. परंतु येथील रसायनी रेल्वे स्थानक विविध समस्यांच्या गर्तेत असून स्थानकात योग्य सुविधा नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.

या स्थानकावर दिवा-मुंबई, रत्नागिरी, गोव्याच्या दिशेने येणाऱ्या रेल्वे गाड्या थांबा घेतात. तर नुकतीच सुरु झालेली दिवा-पेण मेमू ट्रेन दिवसात चार वेळा रसायनी रेल्वे स्थानकावर थांबते. रसायनी परिसरात महाविद्यालय असून येथे शिक्षण घेणारे बरेचशे विद्यार्थी रेल्वेने प्रवास करतात. शिवाय रेल्वेने प्रवास करुन कामानिमित्त येणारा कामगारवर्गही मोठा आहे. रसायनी स्थानकावर निवारा शेड नसल्याने प्रवाशांना भर उन्हात तर पावसाळ्यात भिजत गाडीची वाट पाहावी लागते. शिवाय प्रवाशांना बसण्यासाठी स्थानकावर बाकड्यांचीही व्यवस्था नसल्याने ताटकळत उभे रहावे लागत असतानाचे चित्र पहावयास मिळते. तसेच पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था स्थानकात नसल्याने काही अंतरावर पायपीट करत जावे लागते. रेल्वे तिकीटघरही स्थानकापासून काही अंतरावर असून प्रवासी तिकीट घेऊन येईपर्यंत रेल्वे गाडी जाण्याची वेळ येते असे प्रवाशांचे म्हणणे आहे. या स्थानकाच्या फ लाटालगत वाढलेल्या गवताचा मुक्त संचार दिसून येतो. तसेच ध्वनिक्षेपक आणि माहिती यांचा मागमूसही या स्थानकातून प्रवाशांना कधीच ऐकायला मिळाला नसल्याचे प्रवासी सांगतात.
दरम्यान, रसायनी रेल्वे स्थानकावर सोयी सुविधांचा बोजवारा उडाला असल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त होत असून समस्या सोडवाव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून जोर धरत आहे.

Web Title: Problems with the chemical train station; Create features

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.