मुरुडमध्ये पर्यटकांना सर्व सुविधा देणार, तहसीलदारांचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 06:59 AM2018-03-06T06:59:11+5:302018-03-06T06:59:11+5:30

मुरुड-जंजिरामधील असुविधांवर ‘लोकमत’ने ‘मुरुडमध्ये पर्यटन सुविधांची वानवा’ या वृत्ताद्वारे व फोटो फिचरच्या माध्यमातून प्रकाश टाकला. त्या संदर्भात जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी दखल घेऊन मुरुडच्या तहसीलदारांना चौकशीचे आदेश दिले होते. याची गंभीर दखल घेऊन सोमवारी मुरुड तहसीलदार कार्यालयात पुरातत्व विभाग, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, मुख्याधिकारी, बंदर निरीक्षक, सरपंच, ग्रामसेवक या संबंधित खात्याशी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

Providing all the facilities to tourists in Murud, assurances of Tehsildars | मुरुडमध्ये पर्यटकांना सर्व सुविधा देणार, तहसीलदारांचे आश्वासन

मुरुडमध्ये पर्यटकांना सर्व सुविधा देणार, तहसीलदारांचे आश्वासन

Next

आगरदांडा - मुरुड-जंजिरामधील असुविधांवर ‘लोकमत’ने ‘मुरुडमध्ये पर्यटन सुविधांची वानवा’ या वृत्ताद्वारे व फोटो फिचरच्या माध्यमातून प्रकाश टाकला. त्या संदर्भात जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी दखल घेऊन मुरुडच्या तहसीलदारांना चौकशीचे आदेश दिले होते. याची गंभीर दखल घेऊन सोमवारी मुरुड तहसीलदार कार्यालयात पुरातत्व विभाग, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, मुख्याधिकारी, बंदर निरीक्षक, सरपंच, ग्रामसेवक या संबंधित खात्याशी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुरुड तहसीलदार उमेश पाटील यांनी संबंधित अधिकाºयांची कानउघाडणी केली. पर्यटन स्थळांपैकी जंजिरा किल्ला महत्त्वाचा आहे. त्याकरिता काय योजना करता येईल यासाठी बैठक आयोजित करण्यात येणार
आहे.
अरुंद रस्त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. त्यावेळी उपअभियंता नीलेश खिलारे म्हणाले की, एकदरापासून ते राजपुरी ग्रामपंचायत डांबरीकरणाचे काम मंजूर असून निविदा स्तरावर आहे. संरक्षण भिंती पावसाळ्यापूर्वी बांधून देणार मात्र राजपुरी ग्रामपंचायत हद्दीतील निवासस्थाने रस्त्यालगत असल्याने रस्ता रु ंदीकरण होणार नाही. जंजिरा किल्ल्याकडे जाणारा अंतर्गत रस्ता दुरुस्तीकरिता जिल्हापरिषदेकडे पत्रव्यवहार करून लवकर रस्ता बनवण्यात येईल, असे पंचायत समिती सहायक प्रशासन अधिकारी प्रकाश पवार यांनी सांगितले.
पुरातत्व खात्याचे वरिष्ठ संरक्षण सहायक शैलेंद्र कांबळे म्हणाले की, किल्ल्यामध्ये पुरु षांकरिता व महिलांकरिता एक एक शौचालय चालू आहे. त्याठिकाणी पाण्याची उत्तम सोय केली आहे. परंतु पर्यटकांची संख्या जास्त असल्यामुळे ते अपुरे पडत आहे. जर शासनाने मोठ्या स्वरूपात निधी उपलब्ध करून दिला तर शौचालयामध्ये वाढ करू व होणारी गैरसोय थांबवू असे ते यावेळी
म्हणाले.
किल्ल्याची माहिती देणारा फलक लावणार व इतर सोयी पर्यटकांसाठी उपलब्ध करून देऊ असे अभिवचन यावेळी उपस्थितांना दिले.
ज्यांना जंजिरा किल्ल्याविषयी काहीच माहीत नाही,ज्यांना इतिहास माहीत नाही असे राजपुरी येथील स्थानिक लोक जे गाइडचे काम करीत आहेत त्यांना त्यांचे काम करू देणार नाही. त्यांच्यावर प्रतिबंध आणणार असल्याचे पुरातत्व खात्याचे वरिष्ठ सहायक शैलेश कांबळे यांनी सांगितले.
या बैठकीत पुरातत्व वरिष्ठ संरक्षण सहायक शैलेश कांबळे, बंदर निरीक्षक अतुल धोत्रे, मुख्याधिकारी दयानंद गोरे, बांधकाम खात्याचे अधिकारी नीलेश खिलारे, पंचायत समिती सहायक प्रशासन अधिकारी प्रकाश पवार, सरपंच हिरकणी गिदी, ग्रामविकास अधिकारी अनिल चवरकर, रूपाली कवाडे आदी या बैठकीसाठी हजर
होते.

1नवीन जेट्टीवर शौचालये बांधून तयार आहेत. मात्र या ठिकाणी पाणी नसल्याने शौचालये चालू नाहीत. पाण्यासाठी ग्रामपंचायतीकडे अनेक पत्रव्यवहार करण्यात आले आहे, परंतु अजूनपर्यंत पाण्याची लाइन देण्यात आली नाही. त्यावेळी ग्रामविकास अधिकारी अनिल चवरकर यांनी नवीन योजनेतून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यावर तहसीलदार उमेश पाटील यांचे समाधान झाले नाही त्यांनी गटविकास अधिकारी संजय चव्हाण हे ट्रेनिंगकरिता गेले आहेत. ते आल्यावर ग्रामसेवकांना बोलावण्यात येऊन यावर तातडीने निर्णय घेऊन नवीन जेट्टीला तातडीने नळ कनेक्शन दिले जाईल. तसेच राजपुरी नवीन जेट्टी व जुनी जेट्टी येथे पर्यटकांना चढ-उतार करण्याकरिता जो त्रास होत आहे त्याकरिता जेट्टीची उंची वाढवण्यात येणार आहे. राजपुरी जुन्या जेट्टीवर स्वच्छतेचे तीनतेरा वाजले त्याकरिता उपाययोजना करावी अशी सूचना बंदर निरीक्षक अतुल धोत्रे यांनी मांडली. त्यावर ग्रामसेवकांनी स्वच्छतेकडे लक्ष द्यावे असे आदेश दिले.

2जंजिरा किल्ल्यासाठी स्वतंत्र तरंगती जेट्टी असावी याकरिता आम्ही प्रयत्न करणार असल्याचे बंदर निरीक्षक अतुल धोत्रे यांनी सांगितले. कासा किल्लाकरिता तरंगती अथवा अन्य कोणताही प्रस्ताव आमच्याकडे प्राप्त नाही. दिल्लीवरून याबाबत कोणतीही सूचना आलेली नसल्याचा स्पष्ट उल्लेख पुरातत्व खात्याचे अधिकाºयांनी स्पष्टपणे सांगितले. जंजिरा किल्ल्यावरील तरंगत्या जेट्टीचा प्रस्ताव पुरातत्व खात्याने मंजूर केला असून तो दिल्लीला मंजुरीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती सुद्धा पुरातत्व अधिकारी वर्गाने या सभेच्या निमित्ताने दिली.

राजपुरी ग्रा.पं.ने माहिती कें द्र उभारावे
तहसीलदारांनी माहिती केंद्र राजपुरी ग्रामपंचायतीने करावे कारण जंजिरा किल्ला पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने पर्यटक येत असतात ते ज्यावेळी राजपुरी ग्रामपंचायत हद्दीत येतात त्यावेळी त्यांच्याकडून स्वच्छता कर या नावाने फी आकारली जाते.
पर्यटक येण्यामुळे ग्रामपंचायतीस उत्पन्न मिळत आहे म्हणून राजपुरी ग्रामपंचायतीने माहिती केंद्र स्थापन करावे अशी सूचना तहसीलदार उमेश पाटील यांनी मांडली, परंतु उपस्थित राजपुरी सरपंच व ग्राम विकास अधिकाºयांनी यावर मौन पाळले त्यामुळे भविष्यात माहिती केंद्र होईलच असे नाही.
स्थानिक पत्रकारांनी राजपुरी येथील नवीन जेट्टीवर बंदर निरीक्षकांनी एलएलडीव्दारे आॅडीओ-व्हिडीओव्दारे किल्ल्याची माहिती मिळाली तर वेटिंग करणारे व किल्ला पाहून येणाºया पर्यटकांना यांचा फायदा होईल अशी सूचना मांडली. यावर बंदर निरीक्षक अतुल धोत्रे यांनी किल्ल्याची सर्व माहिती पुरातत्व खात्याकडे असून त्यांनी नवीन जेट्टीवर ही सर्व व्यवस्था करावी आम्ही परवानगी देण्यास तयार आहोत.

Web Title: Providing all the facilities to tourists in Murud, assurances of Tehsildars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.