रायगड जिल्हा परिषदेतील सात कर्मचाऱ्यांना बाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 01:21 AM2020-08-08T01:21:45+5:302020-08-08T01:22:13+5:30
एकूण २३१ कर्मचाºयांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ७ कर्मचाºयांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे पुढे आले आहे.
अलिबाग : कोरोना संदर्भातील अँटिजन तपासणीत रायगड जिल्हा परिषदेतील सात कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतील कर्मचाºयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कर्मचाºयांनी खबरदारी घेत जिल्हा परिषद कार्यालयाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, शासकीय कार्यालयांमध्ये अँटिजन तपासणीचे आयोजन करण्यात येत आहे. रायगड जिल्हा परिषदेतही ६ आॅगस्ट रोजी कर्मचाºयांची अँटिजन तपासणी करण्यात आली.
एकूण २३१ कर्मचाºयांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ७ कर्मचाºयांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे पुढे आले आहे. कोरोनाची बाधा झालेल्या कर्मचाºयांमध्ये सामान्य प्रशासन विभागातील ३, शिक्षण विभागातील ३ आणि आरोग्य विभागातील एका कर्मचाºयाचा समावेश आहे.
पॉझिटिव्ह आलेल्या कर्मचाºयांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, खबरदारी घेत तत्काळ जिल्हा परिषद इमारतीचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.