उरणमध्ये शिवसमर्थ स्मारक, जेएनपीटी करणार ३० कोटी खर्च , फेब्रुवारी २०१९ पर्यंत स्मारक प्रत्यक्षात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 02:34 AM2018-03-01T02:34:32+5:302018-03-01T02:34:32+5:30

शिवरायांच्या राजधानीतच रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात जेएनपीटी प्रशासन शिवसमर्थ स्मारक उभारणार आहे. दास्तान फाटा येथील जेएनपीटीच्या प्रवेशद्वारावरच दोन एकर क्षेत्रातील १६०० स्क्वेअर मीटरमध्ये २० फूट उंचीचा श्रीसमर्थ आणि शिवरायांचा उभा भव्य पूर्णाकृती ब्राँझचा पुतळा उभारण्यात येणार आहे.

 Shivasamtha Memorial in Uran, JNPT expires 30 crores, monument actually until February 2019 | उरणमध्ये शिवसमर्थ स्मारक, जेएनपीटी करणार ३० कोटी खर्च , फेब्रुवारी २०१९ पर्यंत स्मारक प्रत्यक्षात

उरणमध्ये शिवसमर्थ स्मारक, जेएनपीटी करणार ३० कोटी खर्च , फेब्रुवारी २०१९ पर्यंत स्मारक प्रत्यक्षात

googlenewsNext

उरण : शिवरायांच्या राजधानीतच रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात जेएनपीटी प्रशासन शिवसमर्थ स्मारक उभारणार आहे. दास्तान फाटा येथील जेएनपीटीच्या प्रवेशद्वारावरच दोन एकर क्षेत्रातील १६०० स्क्वेअर मीटरमध्ये २० फूट उंचीचा श्रीसमर्थ आणि शिवरायांचा उभा भव्य पूर्णाकृती ब्राँझचा पुतळा उभारण्यात येणार आहे. या प्रस्तावित प्रकल्पासाठी जेएनपीटी सुमारे ३० कोटी खर्च करणार आहे. तर २० फुटी उंच ब्राँझच्या पुतळ्याच्या कारागिरीवरच एक कोटी ९५ लाख खर्च होणार आहेत. फेब्रुवारी २०१९पर्यंत शिवसमर्थ स्मारक प्रत्यक्षात अवतरणार आहे.
जेएनपीटी बंदराच्या उभारणीनंतर जेएनपीटी अंतर्गत खासगीकरणाच्या माध्यमातून आणखी तीन खासगी बंदरे अस्तित्वात आली आहेत. देशातील महत्त्वाचे व्यापारी केंद्र बनण्याच्या तयारीत असलेल्या नवी मुंबई परिसरातील नवी मुंबई विमानतळ, शिवडी-न्हावा शेवा सी लिंक आदी महत्त्वाक ांक्षी प्रस्तावित प्रकल्पही उभारण्याची सुरुवात झाली आहे. नुकताच नवी मुंबई विमानतळाच्या पायाभरणी आणि जेएनपीटीच्या चौथ्या बंदराच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे. त्यानंतर आता छत्रपती शिवरायांची राजधानी असलेल्या रायगड जिल्ह्यातील उरण येथे शिवसमर्थ स्मारक उभारण्याची तयारी जेएनपीटीने सुरू केली आहे. सुमारे ३० कोटी खर्चाचा हा प्रस्तावित प्रकल्प आहे. त्यापैकी एक कोटी ९५ लाख रुपये २० फूट उंचीच्या ब्राँझच्या पुतळ्यासाठी खर्च करण्यात येणार आहेत. या ब्राँझच्या शिवसमर्थ स्मारकाचा पुतळा बनविण्याची वर्क आॅर्डर जेएनपीटीने नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते देण्यात आली आहे. स्मारकाचे शिल्प बनविण्याचे काम पुण्याच्या चित्रकल्प आर्ट स्टुडिओ कंपनीला देण्यात आले आहे. शिव समर्थ स्मारकाचे काम दोन टप्प्यांत करण्यात येणार आहे.
असे असेल शिवसमर्थ स्मारक -
-स्मारक उभारण्यासाठी २२ मीटर उंचीचे आणि १६०० स्क्वेअर मीटर क्षेत्रात हे बिल्डिंग स्ट्रक्चर उभारण्यात येणार आहे. त्यानंतर त्याच्यावर २० मीटर उंचीचा समर्थ रामदास स्वामी आणि शिवरायांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. म्हणजे स्ट्रक्चरसह साधारणत: ९२.५ फूट उंचीवर शिवसमर्थ स्मारक बसविण्यात येणार आहे. इतक्या उंचीचे स्मारक परिसरातून कुठूनही दृृष्टीस पडणार आहे.
-उरण तालुक्यातील दास्तान फाटा येथील जेएनपीटीच्या मालकीच्या दोन एकर जागेत हे स्मारक उभारण्यात येणार आहे. या शिव स्मारक क्षेत्रात आर्ट गॅलरी बनविण्यात येणार आहे. या आर्ट गॅलरीमध्ये शिवरायांच्या जीवनावरील विविध प्रसंगाची धातूची शिल्पे लावण्यात येणार आहेत. तसेच रायगडमधील थोर व्यक्तींची प्रासंगिक चित्रे आर्ट गॅलरीमध्ये लावली जाणार आहेत.
-या आर्ट गॅलरीमध्ये शिवकालीन वस्तूंचे म्युझियमही साकारले जाणार आहे. तसेच सांस्कृतिक आणि विविध मनोरंजनाचे कार्यक्रम सादर करण्यासाठी मिनी एमपी थिएटरही उभारण्यात येणार आहे. अद्ययावत कॅफेटेरिया बरोबरच दीड एकर क्षेत्रात फाउंटन आणि उद्यानाची निर्मिती करण्यात येणार आहे. सुमारे ३० कोटी खर्चाचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुढल्या वर्षी फेब्रुवारी २०१९मध्ये प्रत्यक्षात पूर्णत्वास जाणार आहे.

Web Title:  Shivasamtha Memorial in Uran, JNPT expires 30 crores, monument actually until February 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.