शानदार पोलीस मानवंदनेअंती रोहा शहराचे ग्रामदैवत श्री धावीर महाराज पालखी सोहळ्यास प्रारंभ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2017 10:10 PM2017-10-01T22:10:25+5:302017-10-01T22:12:24+5:30
रविवारी पहाटे रायगड पोलिसांच्या सशस्त्र मानवंदनेने मोठया उत्साहात श्री धाविर महाराजांच्या पालखी सोहळयास प्रारंभ झाला.
रायगड- रविवारी पहाटे रायगड पोलिसांच्या सशस्त्र मानवंदनेने मोठया उत्साहात श्री धाविर महाराजांच्या पालखी सोहळयास प्रारंभ झाला. भल्यापहाटेचा हा सलामीसोहळा आपल्या नजरेत टिपण्यासाठी भविकांची मंदीरात प्रचंड गर्दी झाली हाेती. पाेलीस सलामी अंती ढोलताशांच्या गजरात पालखीचा प्रारंभ झाला.
पालखीच्या स्वागतासाठी शहरातील रस्ते फुलांनी आणी रांगोळयांनी सजवलेले हाेते. धावीर महाराजांची पालखी ग्रामस्तांना दर्शन देत दुसऱ्या दिवशी सकाळी मंदीरात परतते. यावेळी पून्हा महाराजांना पोलिस मनवंदना देण्यात येते व अपुर्व अशा उत्साहामध्ये सुरू झालेल्या या सोहळयाची सांगता होते , श्री धावीर महाराज यांचा नवरात्रि उत्सव व पालखी मिरवणूक म्हणजे रोहेकरांसाठी एक कौटूंबिक धार्मिक सोहळाच असतो.
पाेलीस मानवंदना असणारे राज्यातील एकमेव देवस्थान
ब्रिटीश काळापासून सुरू असलेेली पोलीस मानवंदना भारतात कलकत्ता आणि रायगड जिल्हयांतील रोहा येथील श्री धावीर महाराजांना आजही परंपरेनुसार दिली जाते. राज्यातील पाेलीस मानवंदना असणारे हे एकमेव देवस्थान आहे.