जेएनपीटीच्या तीन क्रे न्स भंगारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 03:10 AM2020-08-07T03:10:39+5:302020-08-07T03:11:01+5:30
बंदराचा व्यापार कोलमडणार? : वादळी पावसाच्या तडाख्याने कोट्यवधींचे नुकसान
उरण : मालवाहू जहाजातील मालाचे कंटेनर चढ-उतार करणाऱ्या रेल माऊंटन क्यूसी क्रेन्स म्हणजे जेएनपीटी बंदराचे कामकाज करणारे हातच आहेत. बुधवार, ५ आॅगस्ट रोजी आलेल्या भयानक वादळी पावसात जेएनपीटीच्या तीन क्रेन्स तुटून पडल्या. यामुळे जेएनपीटीच्या कामकाजावर परिणाम तर होणारच आहे; मात्र उर्वरित असलेल्या सात क्यूसी क्रेनद्वारेच यापुढे कंटेनर मालाची हाताळणी करावी लागणार असल्याची माहिती जेएनपीटीचे वरिष्ठ प्रबंधक तथा सचिव जयंत ढवळे यांनी दिली.
बुधवारी दुपारी तीन-चार वाजण्याच्या सुमारास जोरदार आलेल्या वादळाच्या तडाख्यात जेएनपीटीच्या मालकीच्या बंदरात उभ्या असलेल्या तीन क्यूसी क्रेन्स सापडल्या. ४० मीटर उंचीच्या आणि जहाजातील मालाचे कंटेनर चढउतार करणाºया ६, ७, ८ क्रमांकाच्या तीन क्यूसी क्रेन्स पाहता पाहताच मागच्या बाजूला थेट समुद्रात पत्त्यासारख्या कोसळल्या. सुदैवाने कंटेनर लोडिंग केल्यानंतर मालवाहू जहाज दुपारी १.३० वाजताच बंदरातून रवाना झाले होते. त्यामुळे तीनही क्यूसी क्रेन्सवरील कामगार अपघाताआधीच बाहेर पडले होते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली असल्याची माहिती जेएनपीटी प्रशासनाचे वरिष्ठ प्रबंधक जयंत ढवळे यांनी दिली.
नैसर्गिक आपत्तीत एक नव्हे, तर तीन क्यूसी क्रेन्स मोडून पडल्या आहेत. मोठ्या प्रमाणात झालेल्या आर्थिक नुकसानीचा आढावा घेण्याचे काम संबंधित विभागाकडून सुरू करण्यात आले आहे. त्यांच्याकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतरच आर्थिक नुकसानीची नेमकी माहिती कळू शकेल, असेही ढवळे यांनी सांगितले.
कु ठे चूक झाली? चौकशीची गरज: वादळी वाºयासह नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी क्यूसी क्रेन्स हायड्रोलिक लॉक करून ठेवण्याची व्यवस्था आहे. यामध्ये तर काही चूक झाली नाही ना? याचीही चौकशी करण्याची आवश्यकता आहे. जेएनपीटीच्या बुधवारी कोसळलेल्या तीनही क्रेन्स भंगारातच गेल्या आहेत. आणखी तीन क्रेन्स स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात आल्याखेरीज सुरू होणार नाहीत. त्यामुळे सध्या तरी चार क्यूसी क्रेन्सवरच जेएनपीटी बंदराला कामकाज करावे लागणार असल्याचे कामगारांकडून सांगितले जात आहे.
सूचना असूनही खबरदारीकडे दुर्लक्ष
बुधवारी जोरदार आलेल्या वादळात जेएनपीटीच्या मालकीच्या बंदरात मालवाहू जहाजातील कंटेनर मालाची चढउतार करणाºया तीन रेल माऊंटन क्यूसी क्रेन्स कोसळून निकामी झालेल्या आहेत. एकाच वेळी दोन कंटेनर चढउतार करण्याची क्षमता असलेल्या एका क्रेनची किंमत साधारणत: ६० ते ६५ कोटींच्या आसपास आहे. याआधीच दहापैकी आणखी तीन क्रेन्स एकमेकांवर आदळून निकामी झालेल्या असल्याचे कामगारांकडून सांगितले जात आहे. या क्रेन्सचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात आल्याखेरीज मालाची चढउतार करणे शक्य होणार नाही. वादळाची आगामी सूचना दिली असतानाही प्रशासनाने खबरदारी घेतली नसल्याचा आरोपही कामगारांकडून केला जात आहे.