रायगड जिल्ह्यातील दहा तहसीलदारांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 04:55 AM2019-02-22T04:55:36+5:302019-02-22T04:56:01+5:30

बदलीच्या ठिकाणी हजर न झाल्यास कारवाई

Transfers of ten Tehsildars in Raigad district | रायगड जिल्ह्यातील दहा तहसीलदारांच्या बदल्या

रायगड जिल्ह्यातील दहा तहसीलदारांच्या बदल्या

Next

अलिबाग : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने तब्बल ३५ तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत, त्यामध्ये रायगडमधील दहा तहसीलदारांचा समावेश आहे. तत्काळ बदलीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश सरकारने संबंधितांना दिले आहेत. सरकारने हे आदेश २० फेब्रुवारीला काढून तत्काळ कार्यमुक्त केले आहे. संबंधित अधिकारी तातडीने बदली झालेल्या ठिकाणी हजर न झाल्यास त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.

२०१९ ची लोकसभा निवडणूक आता काहीच दिवसांवर येऊन ठेपली आहे. निवडणूक आयोगाकडून कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्याआधीच प्रशासकीय सेवेत कार्य करणाºया तहसीलदार दर्जाच्या अधिकाºयांच्या बदल्या करण्यात आल्याचे बोलले जाते. पेणचे तहसीलदार अजय पाटणे यांची बदली मालवणच्या तहसीलदार पदावर झाली आहे. सुधागड-पालीचे तहसीलदार बाबुराव निंबाळकर यांची बदली रत्नागिरी येथे अप्पर तहसीलदार या पदावर झाली आहे. त्यांच्या जागी मुंबई उपनगरचे दिलीप रायण्णावार हे कार्यभार सांभाळणार आहेत. मुरुडचे तहसीलदार उमेश पाटील यांची मुंबई उपनगर जिल्ह्यातील करमणूक विभागात बदली झाली आहे. त्यांच्या जागी रत्नागिरीचे परीक्षित पाटील यांची बदली झाली आहे. पोलादपूरचे तहसीलदार शिवाजी जाधव यांना खेड तहसीलदारपदी पाठवले आहे.
म्हसळा तालुक्याचे रामदास झळके यांना सिंंधुदुर्ग येथे तर त्यांच्या जागी वेंगुर्ल्याचे शरद गोसावी यांना आणण्यात आले आहे.
अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयातील सुरेंद्रसिंग ठाकूर यांना कल्याण येथील संजय गांधी योजना विभागात धाडण्यात आले आहे. त्याचप्रमाणे अलिबाग येथील संजय गांधी योजनेच्या काम पाहणाºया प्राजक्ता घोरपडे यांना पोलादपूरच्या तहसीलदारपदी बसवले आहे.

पेणमध्ये अरुणा जाधव
च्पनवेलचे तहसीलदार दीपक आकडे यांना कल्याणच्या तहसीलदारपदी, तर त्यांच्या जागी कल्याणवरून अमित सानप यांना पाचारण केले आहे. पेणच्या तहसीलदारपदी अरुणा जाधव आल्या आहेत, तर कविता जाधव यांना रोहे तहसीलदारपदी बसवले आहे.

Web Title: Transfers of ten Tehsildars in Raigad district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.