- कांता हाबळेनेरळ : कर्जत-कल्याण राज्यमार्गावर चिंचवली ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या आदिजन विद्या प्रसारक मंडळाच्या भाऊसाहेब राऊत विद्यालयाला सुमारे २५ वर्षे कुंपणाची भिंत नसल्याने विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून ये-जा करावी लागत होती. चिंचवली ग्रामपंचायत आणि शाळा व्यवस्थापनाच्या वादात ही संरक्षक भिंत रखडली असल्याचे समोर आले होते. अखेर पालक आणि ग्रामस्थांच्या तक्र ारीनंतर यावर तोडगा काढत शाळेला तारेचे कंपाउंड घातल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.कर्जत-कल्याण या राज्यमार्गाला लागून कर्जत तालुक्यातील चिंचवली ग्रामपंचायत हद्दीत भाऊसाहेब राऊत विद्यालय आहे. ही शाळा अनेक वर्षे संरक्षक भिंतीअभावी चर्चेत होती. १९८१ मध्ये या शाळेची स्थापना झाली आहे. शाळेच्या स्थापनेपासून २५ वर्षे शाळेला कुठल्याही प्रकारची संरक्षक भिंत नव्हती. त्यामुळे या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. येथे शिशू वर्गापासून बारावीपर्यंत सुमारे दोन हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत शाळा व्यवस्थापनाकडून कुठल्याही प्रकारची काळजी घेतली जात नव्हती.शाळेच्या समोर कर्जत-कल्याण राज्यमार्ग असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरूच असते. शाळा सुटण्याच्या वेळी सर्व विद्यार्थी या राज्यमार्गावर येत असल्याने वेगाने कार, ट्रक ये-जा करत असल्याने विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. यावर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा व्यवस्थापन समिती आणि शाळा प्रशासनाने या शाळेला संरक्षक भिंत बांधावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून होत होती. या संदर्भात पालकांनी शाळा प्रशासनाकडे तक्र ारी केल्या होत्या, तसेच माध्यमांतून या संदर्भात बातम्या प्रसिद्ध केल्या होता.चिंचवली ग्रामपंचायतीने सहकार्य केल्याने शाळा व्यवस्थापनाला हे तारेचे कंपाउंड घालता आले. गेली अनेक वर्षे शाळेला संरक्षक भिंत नसल्याने विद्यार्थ्यांचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. पालक आणि ग्रामस्थांच्या तक्र ारीनंतर शाळेला तारेचे कंपाउंड घालण्यात आले आहे, त्यामुळे आता विद्यार्थ्यांचा बचाव होण्यास मदत होणार आहे.- किशोर गायकवाड, ग्रामस्थ, डिकसळशाळेला कंपाउंड नसल्याने मुलांच्या जीवाला धोका संभवत होता. अनेक वेळा आम्ही शाळेकडे संरक्षक भिंत बांधण्यात यावी, अशी मागणी केली होती. अखेर शाळेने तारेचे कंपाउंड घातले आहे, त्यामुळे धोका टळला असल्याने शाळेचे आभार.- हरिश्चंद्र वाघमारे, पालक
भाऊसाहेब राऊत विद्यालयाला २५ वर्षांनंतर तारांचे कुंपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 11:38 PM