कर्क राशीच्या जातकांसाठी २०२१ चे वर्ष खूपच चांगले असल्याचे दिसत आहे. आपण जर आपल्या मानसिक चिंतांवर नियंत्रण मिळवू शकलात तर हे वर्ष आपल्यासाठी उत्तम जाण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. आपल्या परिस्थितीतून आपणास बरेच काही शिकावयास मिळेल व त्यामुळे आपण जीवनात प्रगती साधू शकाल. २०२१ दरम्यान आपल्या व्यापारात प्रगती होऊन आपण एक यशस्वी व्यावसायिक होऊ शकाल. आपण निव्वळ आपल्या एकट्याचाच फायदा न बघता समाजाचा सुद्धा विचार करून सामाजिक हितासाठी कार्यरत राहाल. आपल्या मान - सन्मानात वाढ होईल. आपल्या समृद्धीत वृद्धी होईल. हे वर्ष धन प्राप्तीसाठी उत्तम आहे. आव्हाने तर येतीलच, परंतु अशा परिस्थितीत सुद्धा चांगला फायदा होईल. विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळू शकेल. २०२१ दरम्यान आपणास वजन वाढण्याच्या समस्येस सामोरे जावे लागण्याची शक्यता असल्याने आहारातून चरबीयुक्त पदार्थ टाळावे लागतील. ह्या वर्षाची महत्वाची बाब म्हणजे आपणास आपल्या वैवाहिक जीवनात सत्यास सामोरे जावे लागेल व ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करत आहात त्या व्यक्तीशी एकनिष्ठ राहूनच आपल्या नात्यास आपण पुढे नेऊ शकाल, अन्यथा स्थिती प्रतिकूल सुद्धा होईल. आपण आपल्या कुटुंबाकडे पूर्णपणे लक्ष द्याल व कौटुंबिक जवाबदाऱ्या उत्तम प्रकारे उचलू शकाल. ह्यामुळे आपल्या कुटुंबियांचे प्रेम लाभून आपणास मानसिक समाधान सुद्धा मिळेल. आपल्यासमोर येणाऱ्या आव्हानांमुळे न डगमगता एखाद्या योद्ध्याप्रमाणे त्यांचा सामना कराल.
वैवाहिक जीवन (Cancer,Love and relationship Horoscope 2021)
कर्क राशीच्या जातकांना २०२१ दरम्यान प्रेमालाप करावयास अनेक संधी मिळणार असल्याने ह्या वर्षाची सुरवात वैवाहिक जीवनासाठी अत्यंत चांगली होणार आहे. ह्या वर्षात आपण एखाद्याच्या प्रेमात स्वतःहून भिजून जाल. जानेवारी ते मार्च दरम्यान आपल्या प्रियव्यक्तीस विवाहाचा प्रस्ताव देऊन त्यात यशस्वी सुद्धा होऊ शकाल. एप्रिल, मे व जून २०२१ दरम्यान मात्र आपले म्हणणे प्रियव्यक्तीस सांगण्यात व समोरच्या व्यक्तीस ते समजण्यात अडचणी येण्याच्या शक्यतेमुळे अपेक्षेनुसार परिणाम मिळू शकणार नाही. अशा परिस्थितीत एकमेकांशी संवाद साधून नाते दृढ करण्याचा प्रयत्न करावा. जून व जुलै दरम्यान आपले वैवाहिक जीवन पुन्हा खुलून संबंध दृढ होतील. कर्क राशीच्या विवाहित जातकांसाठी २०२१ चे वर्ष आव्हानात्मक राहील व अशी परिस्थिती आपण जर धीराने हाताळली नाहीत तर नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. विशेषतः वर्षाचा मधला भाग निर्बल दिसत आहे. आपण जर योग्य तितकी काळजी घेतलीत तर वर्षाचे अखेरचे महिने अनुकूल परिणाम देणारे ठरू शकतील.
१२ राशींचे २०२१ चे भविष्य वाचण्यासाठी क्लिक करा!
आर्थिक (Cancer,Finance Horoscope 2021)
कर्क राशीच्या जातकांसाठी २०२१ दरम्यान आर्थिक स्थिती वर्षाच्या सुरवातीस उत्तम असेल व एकाहून अधिक स्रोतातून आपणास धन प्राप्ती होईल. आपणास वाम मार्गाने धन प्राप्तीचे मार्ग दाखवणाऱ्या अनेक संधी येतील, मात्र आपण त्या उचलू नये अन्यथा भविष्यात आपणास त्याचा त्रास होऊ शकतो हे लक्षात ठेवावे. वर्षाचे मधले दिवस अपेक्षेनुसार निर्बलच राहणार असल्याने आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. आपली एखादी मोठी महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी बँकेकडून किंवा एखाद्या व्यक्तीकडून कर्ज घेऊ शकाल. २०२१ चे अखेरचे महिने अपेक्षेनुसार अनुकूल असतील. ह्या दरम्यान आपला व्यावसायिक भागीदार आपल्या बरोबर चर्चा करून व्यापारासाठी हितकारक ठरेल अशा एखाद्या योजनेवर कार्यरत राहील.
नोकरी, व्यवसाय, करिअर (Cancer,Job-Career-Business Horoscope 2021)
नोकरी करणाऱ्या कर्क राशीच्या जातकांसाठी २०२१ ची सुरवात खूपच चांगली होऊन त्यांना एखादे पद सुद्धा प्राप्त होऊ शकते. ह्याच बरोबर त्यांच्या कर्तव्यात व पदभारातसुद्धा वृद्धी होईल. ह्या दरम्यान परिस्थिती आपणास प्रतिकूल होऊ नये म्हणून आपण अति आत्मविश्वासा पासून दूर राहावे. अपेक्षेनुसार वर्षाचे मधले दिवस सामान्यच असतील, मात्र वर्षाच्या अखेरच्या तीन महिन्यात आपणास उत्कृष्ट कामगिरी व कौशल्यामुळे चांगले परिणाम मिळू शकतील. आपण दृढपणे आपले कार्य कराल व त्यामुळे आपली एक वेगळी ओळख सुद्धा निर्माण होईल. आपण जर व्यापार करत असाल तर ह्या वर्षी आपल्या व्यापारात वृद्धी होईल. आपण निव्वळ व्यापारच करणार नाहीत तर समाज कल्याणासाठी कार्यरत व्हाल व त्यामुळे आपणास मान - सन्मान प्राप्त होऊन आपल्या व्यापारात सुद्धा लाभ होईल.
शिक्षण (Cancer,Education Horoscope 2021)
ग्रहांच्या सद्य स्थितीनुसार ह्या वर्षात आपणास गूढ विद्येशी संबंधित विषयांची गोडी लागेल. आपण अध्ययन करत असलेल्या विषयांना खोलात शिरून समजून घेण्याचा प्रयत्न केलात तरी त्यात आपल्या आवडत्या विषयांनाच प्राधान्य असेल. उर्वरित विषयात आपणास अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. भूगोल, इतिहास, कॉम्प्युटर, प्रोग्रामिंग, माहिती व तंत्रज्ञान इत्यादी विषयांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष अत्यंत उपयुक्त ठरणारे असून त्यांना खूपच चांगले परिणाम प्राप्त होतील. उच्च शिक्षणासाठी प्रयत्नरत असलेल्या विद्यार्थ्यांना वर्षाच्या सुरवातीस यश मिळू शकेल, मात्र त्यासाठी त्यांना एखाद्या वरिष्ठ व्यक्तीच्या सल्ल्यानुसार काम करावे लागेल. परदेशी जाऊन शिक्षण घेण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्षाच्या मध्यास आंशिक यश मिळण्याची शक्यता आहे.
आरोग्य (Cancer,Health Horoscope 2021)
कर्क राशीच्या व्यक्तींसाठी २०२१ च्या सुरवातीचे काही महिने आरोग्याच्या दृष्टीने चांगले आहेत. असे असले तरी आपणास दोन गोष्टींकडे प्रामुख्याने लक्ष द्यावे लागेल, त्यात प्रथम म्हणजे त्वचेशी संबंधित काही त्रास होण्याची शक्यता आहे तर दुसरे म्हणजे जानेवारी महिन्यात आमांश किंवा गुप्तांगांची समस्या होऊ नये म्हणून द्रव पदार्थांचा वापर आहारात अधिक प्रमाणात करणे ह्या होत. वर्षाचे मधले दिवस आपली तंदुरुस्ती मजबूत करणारे असल्याने आपल्या जुन्या समस्यां पासून सुद्धा आपली मुक्तता होऊ शकेल. हे वर्ष मानसिक दृष्ट्या आपणास आव्हानात्मक असल्याने स्वतःला सबळ करण्याचा शक्य तितका प्रयत्न करावा. त्यासाठी आवश्यकतेनुसार योगासने व ध्यान - धारणा करावी. २०२१ चे अखेरचे महिने आरोग्याच्या दृष्टीने उत्तम असून आपण आपल्या आत्मविश्वासाच्या जोरावर त्यास निरोगी ठेवू शकाल. शक्तीपेक्षा जास्त काम करण्याच्या वृत्तीवर आळा घातल्यास अति उत्तम.