Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य - १६ डिसेंबर २०२१; भाग्याची उत्तम साथ, एखादी अनपेक्षित संधी मिळेल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 07:46 AM2021-12-16T07:46:14+5:302021-12-16T07:47:02+5:30
Todays Horoscope 16 December 2021 : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...
मेष - अस्थिर परिस्थिती राहील. अनिश्चिततेचे वातावरण असल्याने घालमेल होईल. संयमाने वागणे आवश्यक आहे. दुपारच्या सत्रात हाती घेतलेली कामे मार्गी लागतील. आर्थिक आवक चांगली राहील. नोकरीत कामाचा ताण कमी राहील.
वृषभ - महत्त्वाची कामे दुपारनंतर हाती घ्या. प्रवास करताना खबरदारी घ्या. काहींचा प्रवासाचे बेत अचानक रद्द होईल. रागाच्या भरात कुणाचा अपमान करु नका. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. मात्र एखाद्या कामात दिरंगाई होईल. त्याचे खापर तुमच्यावर फोडले जाईल
मिथुन - अचानक धनलाभ होईल. महत्त्वाचे काम दुपारच्या आत उरका. प्रवासात काळजी घ्या. एखादी अनपेक्षित बातमी कानावर पडेल. जोडीदाराशी मधुर संबंध राहतील. मात्र आपण हुकुमत गाजवण्याचा प्रयत्न करू नका. जमिनीच्या व्यवहारात सावधानता बाळगा
कर्क - नोकरीतील अस्थिरता कमी होईल. काही कामे होतील. झटपट निर्णय घेण्याच्या नादात चुका करु नका. घरात थोडी धावपळ करावी लागेल. मुलांची आबाळ होणार नाही. याची दक्षता घ्या. जोडीदाराशी नात्यात गोडवा राहील. धनलाभ होईल.
सिंह - अचानक प्रवासाचे बेत ठरतील. भाग्याची उत्तम साथ राहील. एखादी अनपेक्षित संधी मिळेल. नोकरीत थोडी अस्थिरता जाणवेल. घरी पाहुणे येतील. घरात किरकोळ कारणावरुन कुरबुर होईल. मुलांना यश मिळेल.
कन्या - आर्थिक आवक चांगली राहील. काहींना प्रवास करावा लागेल. प्रवासात दगदग होण्याची शक्यता आहे. खाण्यापिण्यावर लक्ष द्या. थोडी काळजी घ्या. व्यवसायात वादविवाद होण्याची शक्यता आहे. नोकरीत तुमचा दबदबा राहील. सहकारी मदत करतील.
तूळ - महत्त्वाची काम दुपारच्या आत उरकून घ्या. प्रवास शक्यता टाळा. प्रवासात दगदग होईल. वाहन जपून चालवा. जोडीदाराशी वाद घालू नका. घरात खाण्यापिण्याची रेलचेल राहील. येणाऱ्या जाणाऱ्यांचा राबता राहील. व्यवसायात विक्री चांगली राहील.
वृश्चिक - आर्थिक बाजू चांगली राहील. धनलक्ष्मीची कृपा राहील. भावंडांच्या भेटीगाठी होतील. व्यवसायात विक्री चांगली होईल. महत्त्वाच्या कामासाठी दगदग होईल. काही ना काही खुसपट निघत राहील. जोडीदाराशी वाद होतील. थोडी आपणच माघार घ्यावी.
धनू - पैशांची आवक चांगली राहील. जुन्या व्यवहाराचा लाभ होईल. जोडीदाराशी नात्यात गोडवा राहील. जोडीदार तुमच्या मर्जीनुसार वागेल. व्यवसायाचा अंदाज येणार नाही. दगदगीची कामे टाळा. आरोग्याशी काळजी घ्या. हितशत्रू कारवाया करतील
मकर - एखाद्या व्यवहारात फायदा होईल. मात्र सावधानता बाळगा. जोडीदाराशी काळजी घ्या. घरात कामाची लगबग सुरु राहील. मुलांकडे दुर्लक्ष करू नका. त्यांना योग्य मार्गदर्शन करा. नोकरीत संयमाने बोलणे आवश्यक आहे.
कुंभ - नोकरीत वादाचे प्रसंग होतील. कामात साधकबाधक बदल होतील. घरात थोडा तणाव राहील. नवीन ओळखी फायदेशीर ठरतील. खर्च करण्याकडे कल राहील. व्यवसायात भरभराट होईल. अचानक प्रवास करावा लागेल.
मीन - नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. तुमच्या हिताचे निर्णय घेतले जातील. एखादा सौदा फायदेशीर ठरेल. जवळचे प्रवास होतील. प्रवासात काळजी घ्या. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. परस्पर समन्वय राहील