धनु राशिभविष्य 2021 : आपले साहस व पराक्रम आपणास अनेकदा करतील यशस्वी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2020 03:28 PM2020-12-17T15:28:59+5:302020-12-17T15:29:50+5:30
Sagittarius horoscope 2021: २०२१ दरम्यान धनु राशीचे जातक नवीन गोष्टी शिकण्याच्या किंवा समजून घेण्याच्या प्रवृत्तीत गुंतून जातील. आपण आपल्या कुटुंबीयांची योग्य प्रमाणात काळजी घ्याल. आपल्या समजूतदारपणामुळे कुटुंबातील वातावरण आनंदमय राहील.
धनु राशीच्या जातकांसाठी २०२१ चे वर्ष अत्यंत अनुकूल फलदायी ठरणारे आहे. वर्षाची सुरवातच काही आनंददायी घटनांनी होणार आहे. आपली आर्थिक स्थिती प्रबळ होणार असून विभिन्न समस्यांना सामोरे जाता जाता स्वतःचे स्थान अढळ करण्यात आपण यशस्वी होऊ शकाल. आपले साहस व पराक्रम ह्यांच्या जोरावर अनेक प्रसंगी आपण यशस्वी होऊन आपल्या विरोधकांना चकित कराल. एखाद्या विरोधकानी प्रयत्न केल्यास तो सुद्धा आपल्या समोर हतबल होईल. कोर्ट - कचेरीशी संबंधित कार्यात आपणास यश मिळण्याची शक्यता आहे. २०२१ दरम्यान धनु राशीचे जातक नवीन गोष्टी शिकण्याच्या किंवा समजून घेण्याच्या प्रवृत्तीत गुंतून जातील. आपण आपल्या कुटुंबीयांची योग्य प्रमाणात काळजी घ्याल. आपल्या समजूतदारपणामुळे कुटुंबातील वातावरण आनंदमय राहील. पूर्वजांचा विचार करून आपण तत्सबंधित काही कार्ये कराल व त्यामुळे आपल्या कुटूंबाच्या मान - मर्यादेत भर पडून आपला कौटुंबिक मान वृद्धिंगत होईल. ह्या वर्षी अनेक अडथळे पार केल्या नंतरच परदेशी जाण्यात आपण यशस्वी होऊ शकाल. ह्या वर्षी माहेरी कडील एखाद्या व्यक्तीशी कटुता निर्माण होण्याची शक्यता असल्याने वेळेवरच त्याची दखल घेऊन त्यास टाळण्याचा प्रयत्न करावा. २०२१ दरम्यान आपणास स्थावर व जंगम संपत्तीचा चांगला लाभ होऊ शकतो. ह्या व्यतिरिक्त आपल्या लहान भावंडांच्या माध्यमातून काही लाभ होऊन वेळप्रसंगी त्यांच्या कडून आर्थिक मदत सुद्धा मिळू शकेल. आपल्या मित्रांचे सहकार्य आपणास मिळू शकेल. असे असले तरी आपल्या विरोधकांवर आपणास बारीक लक्ष ठेवून आपले गुप्त शत्रु शोधावे लागतील. आपल्या धार्मिक प्रवृत्तीत वाढ होऊन आपण आध्यात्मिक कार्ये व पूजा - पाठ इत्यादीत सहभागी व्हाल व त्यातच रममाण व्हाल. आपल्या मानसिक शांततेसाठी आपण ह्या वर्षी अनेक तीर्थस्थानांना भेट द्याल. ह्या वर्षात साधारणपणे आपले आरोग्य उत्तम राहणार असले तरी काही क्षुल्लक समस्या अधून मधून निर्माण होऊ शकतात. कुटुंबातील एखाद्या वडीलधाऱ्या व्यक्तीमुळे काही वाद निर्माण झाल्यास आपणास हस्तक्षेप करून आपल्याला अपेक्षित असलेली कौटुंबिक शांतता प्रस्थापित करावी लागेल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या प्रकृतीमुळे कुटुंबिय चिंतीत होऊ शकतात.
वैवाहिक जीवन (Sagittarius, Love and relationship Horoscope 2021)
२०२१ चे वर्ष वैवाहिक जीवनासाठी खूपच चांगले आहे. धनु जातकांच्या संबंधात प्रेम व जिव्हाळा वृद्धिंगत होईल. अधून मधून काही मतभेद झाले तरी त्यांचे वैवाहिक जीवन प्रगतीपथावर राहिल्याने दोघातील जवळीक वाढेल. २०२१ दरम्यान धनु राशीचे जातक आपल्या प्रेमात बुडून जातील. समाजाची काही पर्वा न करता आपले संबंध दृढ करण्यावर भर द्याल. आपल्यासाठी वर्षाचे सुरवातीचे दोन महिने व वर्षाचा उत्तरार्ध अत्यंत अनुकूल असून ह्या दरम्यान आपले वैवाहिक जीवन प्रबळ करण्यात कुचराई करू नये. विवाहितांचे वैवाहिक जीवन ह्या वर्षी उत्तम राहणार आहे. आपल्या दोघातील समजूतदारपणा विकसित झाल्यामुळे आपले संबंध अधिक दृढ करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहाल. असे असले तरी जोडीदाराच्या अस्वास्थ्यामुळे आपणास त्रास होण्याची शक्यता असल्याने आपणास काळजी घ्यावी लागेल.
१२ राशींचे २०२१ चे भविष्य वाचण्यासाठी क्लिक करा!
आर्थिक (Sagittarius ,Finance Horoscope 2021)
२०२१ चे वर्ष धनु राशीच्या जातकांना आर्थिक दृष्ट्या चांगले जाणारे आहे. आपणास ठराविक प्रमाणात प्राप्ती झाल्याने खर्च झाले तरी कोणत्याही प्रकारच्या आर्थिक समस्येस आपल्याला सामोरे जावे लागणार नाही. आपण निव्वळ आवश्यकच नव्हे तर काही आध्यात्मिक, धार्मिक इत्यादी कार्यात बराचसा पैसा खर्च कराल. असे असले तरी अधून मधून अशी काही परिस्थिती निर्माण होईल कि ज्यावेळेस आपणास काही आवश्यक आर्थिक जवाबदाऱ्या पार पाडण्यासाठी पैसा खर्च करावा लागेल व तेव्हा आपण काही चुकीचे करत नसल्याची आपल्याला खात्री करून घ्यावी लागेल. ह्या दरम्यान आपला हरवलेला पैसा आपणास परत मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपणास मोठा फायदा होऊ शकेल. २०२१ च्या सुरवातीस धनु राशीच्या जातकांना आपल्या पित्याकडून सुद्धा संपत्ती प्राप्त होऊ शकते. सुरवातीचे दोन महिने आपल्यासाठी अत्यंत अनुकूल असून वर्षाच्या अखेर पर्यंत आपले कष्ट आपल्यासाठी नवीन मार्ग खुले करू शकतील. त्यामुळे आपणास धन प्राप्ती होतच राहील.
नोकरी, व्यवसाय, करिअर (Sagittarius ,Job-Career-Business Horoscope 2021)
धनु राशीच्या नोकरी करणाऱ्या जातकांसाठी २०२१ ची सुरवात अत्यंत चांगली होणार आहे. आपल्या कष्टाचे यथोचित फल आपणास मिळेल. आपणास मान - सन्मान सुद्धा मिळतील. इतकेच नव्हे तर वरिष्ठ आपल्यावर खुश होऊन आपली पगारवाढ सुद्धा करतील. कदाचित योग्य वेळी पदोन्नती सुद्धा संभवते. मे व जून दरम्यान तसेच ऑगस्ट महिन्यात काही समस्या निर्माण होण्याच्या शक्यतेमुळे आपणास नोकरीत काळजी घ्यावी लागेल. उर्वरित महिने नोकरीसाठी उत्तमच आहेत. आपण जर व्यापार करत असाल तर २०२१ ची सुरवात आपल्यासाठी खूपच चांगली होणार आहे. आपला भागीदार सुद्धा आपणास महत्व देऊन आपल्याला संपूर्ण सहकार्य करेल. व्यापार वृद्धीत भागीदाराची मदत होईल. वर्षाच्या सुरवातीस आर्थिक गुंतवणूक केल्यास त्यात नुकसान होण्याची शक्यता आहे, तेव्हा काळजी घ्यावी. वर्षाचा मधला भाग व अखेरचे महिने आपल्या व्यापारास चालना देण्यास महत्वाची भूमिका बजावतील.
शिक्षण (Sagittarius ,Education Horoscope 2021)
विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून २०२१ ची सुरवात खूपच चांगली होणार असून त्यांना शैक्षणिक जीवनात उत्तम यश मिळेल. आपल्या दयाळूपणामुळे आपली गणना चांगल्या विद्यार्थी वर्गात होईल. काही विद्यार्थ्यांना वर्षाच्या सुरवातीस आपले घर व कुटुंब ह्या पासून दूर जाऊन शिक्षण घेण्याची संधी मिळू शकेल. अशी संधी आपण अजिबात हातून घालवू नये. उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रयत्नरत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी २०२१ ची सुरवात अत्यंत अनुकूल आहे. त्यांची इच्छापूर्ती झाल्याने खूप आनंद होईल. ज्यांना विदेशात जाऊन शिक्षण घेण्याची इच्छा असेल त्यांना ह्या वर्षी अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार असल्याने त्यांनी जर शक्य तितके नियोजन करून पूर्ण तयारी केली तरच त्यांना यश प्राप्त होऊ शकेल.
आरोग्य (Sagittarius,Health Horoscope 2021)
आरोग्याच्या दृष्टीने २०२१ ची आपली सुरवात काहीशा नाजूक स्थितीने होईल. आपल्या आहारातील असमतोलपणा व दिनचर्येतील अनियमितता आपली प्रकृती नाजूक करण्यास कारणीभूत ठरतील. ह्या वर्षात आपणास नेत्र विकार होण्याची शक्यता आहे. तसेच एखाद्या काळजीमुळे निद्रानाश होण्याची सुद्धा शक्यता आहे. विशेषतः अधून मधून आपणास पाण्याने डोळे धुवावे लागतील व गरज भासल्यास वैद्यकीय सल्ला सुद्धा घ्यावा लागेल. एखादी अशी काही समस्या निर्माण होईल कि ज्यात तज्ञ व्यक्तींना सुद्धा रोगाचे निदान करता येणार नाही, मात्र ही समस्या जशी उदभवली असेल तशीच ती अचानकपणे संपुष्टात येणारी असल्याने जास्त काळजी करू नये. धनु राशीच्या जातकांसाठी २०२१ चे वर्ष आरोग्याच्या दृष्टिकोनातून साधारणतः चांगले असेल. त्यात सुद्धा वर्षाच्या मध्यापासून अखेर पर्यंतचा कालखंड हा सर्वोत्तम आहे. फक्त वर्षाच्या सुरवातीसच आपणास आरोग्य विषयक काळजी घ्यावी लागेल.