शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्जत जामखेडमध्ये अजूनही मतमोजणी सुरु; एका ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड, चिठ्ठ्यांची मोजणी सुरु
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचा आमदार ठरणार
3
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
4
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विजयाचा 'गोडवा' अन् फडणवीसांचे 'जिलेबी सेलिब्रेशन'; भाजपा कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोष
6
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
7
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
8
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
9
महायुतीच्या विजयामुळे गौतम अदानींना अच्छे दिन? धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा...
10
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...
11
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते का? अमृता फडणवीस म्हणाल्या...
12
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : भाजपचा एक डाव अन् दोन राज्यांत काँग्रेसचा 'सुपडा साफ'! गेम चेंजर ठरला हा प्लॅन 
14
उत्तर प्रदेशमध्ये योगींचा जलवा, पोटनिवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय, सपाला धक्का 
15
शिंदेंचा शिलेदार ठरला संगमनेरमध्ये जायंट किलर; थोरातांना पराभूत करणारे अमोल खताळ कोण आहेत?
16
Satara Vidhan Sabha Election Result 2024 Live: 'बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकले यांना एकूण किती मते मिळाली? पाहा आकडेवारी
17
"महाविकास आघाडीपेक्षा जास्त जागा एकनाथ शिंदेंना मिळाल्या"; योगी आदित्यनाथांनी उडवली खिल्ली
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातून महाविकास आघाडीचा सुपडासाफ; सांगलीने लाज राखली
19
सासरे आणि जावई एकत्र दिसणार विधानसभेत! एक अजितदादांचा तर दुसरा भाजपचा शिलेदार
20
Jalgaon City Vidhan Sabha Election Result 2024 Live : जळगाव शहर मतदारसंघात सुरेश भोळे यांची विजयी हॅट्रीक; शहरात समर्थकांचा जल्लोष!

वृश्चिक राशिभविष्य 2021 : मानसिक गोंधळात सुद्धा राहाल उर्जावान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2020 3:23 PM

Scorpio Horoscope 2021: वृश्चिक राशीचे जातक आपल्या रहस्यमय वृतींसाठी ओळखले जातात व हीच वृत्ती आपल्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. ह्याच वृत्तीमुळे आपण आपल्या विरोधकांवर मात करू शकाल.

सुरवातीपासूनच मनात गोंधळ माजल्याने वृश्चिक राशीच्या जातकांसाठी २०२१ ची सुरवात मध्यम फलदायी असेल. जीवनात कोणत्या गोष्टीस अधिक महत्व द्यावे हे समजण्याच्या पलीकडची त्यांची स्थिती झालेली असेल. त्यांच्या कामात सुद्धा आवश्यकतेनुसार त्यांना परिश्रम करावे लागतील, खेरीज जीवनातील इतर बाबींमध्ये सुद्धा त्यांना सक्रिय योगदान द्यावे लागेल. अशा परिस्थितीत आपणास धीर धरून योग्य निर्णय घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. २०२१ दरम्यान वृश्चिक राशीच्या जातकांना भरपूर प्रवास करावे लागतील. दुरवरचेच प्रवास असतील असे नाही, तर संख्यात्मक दृष्ट्या ते जास्त असून आपणास नवीन ऊर्जा प्रदान करणारे होतील. कौटुंबिक जीवनात आंशिक समाधान लाभले तरी कुटुंबातील एखाद्या खास व्यक्तीची प्रकृती आपल्या त्रासास कारणीभूत ठरू शकेल. ह्या दरम्यान आपल्या माता - पित्याना ऋतुजन्य आजार होण्याच्या शक्यतेमुळे आपणास त्यांची योग्य काळजी घ्यावी लागेल. आपण जर एखाद्या खटल्यात अडकला असाल तर ह्या वर्षी निकाल आपल्या बाजूने लागण्याची शक्यता असून त्याची सुरवात वर्षाच्या सुरवातीपासूनच होईल. आपल्या जोडीदाराची आपणास योग्य प्रमाणात साथ मिळाल्याने आपण आव्हानांना मोठ्या धैर्याने सामोरे जाऊ शकाल. पैतृक व्यवसाय सांभाळण्याचा दबाव आपल्यावर येण्याच्या शक्यतेमुळे विचारपूर्वक निर्णय घेणे हितकारी ठरेल. आपल्या भावंडांना आपल्या मदतीची अत्यंत गरज भासणार असल्याने त्यांच्या प्रती असलेल्या जवाबदाऱ्या आपणास पूर्ण कराव्या लागतील. वृश्चिक राशीचे जातक आपल्या रहस्यमय वृतींसाठी ओळखले जातात व हीच वृत्ती आपल्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. ह्याच वृत्तीमुळे आपण आपल्या विरोधकांवर मात करू शकाल. जीवनाप्रती आपण आशावादी राहून आपल्या प्रियव्यक्तीस कोणत्याही परिस्थितीत खुश ठेवण्याचा प्रयत्न कराल. आपल्या प्रियव्यक्तीच्या चेहेऱ्यावर हसू उमटण्यासाठी आपण जीवापाड परिश्रम सुद्धा कराल. धन प्राप्तीस अनुकूल स्थिती सुद्धा निर्माण होईल. २०२१ चे मधले महिने काहीसे निर्बलीच राहिले तरी अखेरचे महिने विशेषतः शेवटचे तीन महिने आपल्यासाठी उत्तम असून त्या दरम्यान आपण आपल्या कार्यात यशस्वी होऊ शकाल.

वैवाहिक जीवन (Scorpio, Love and relationship Horoscope 2021)

प्रेमाच्या बाबतीत वृश्चिक राशीच्या जातकांसाठी २०२१ ची सुरवात चांगली होईल. आपण जर कोणावर प्रेम करत असाल तर मोकळेपणाने आपले प्रेम व्यक्त कराल व त्यामुळे समोरची व्यक्ती सुद्धा आपल्या प्रेमात पडल्याने आपल्या प्रेमास पुष्टी मिळेल. आपण जर अजून कोणाच्या प्रेमात पडला नसाल तर ह्या वर्षी नक्कीच आपण कोणाच्या तरी प्रेमात पडाल. एखाद्या प्रवासा दरम्यान आपण अशा एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने आपल्यातील जवळीक व आपुलकी वाढल्याने आपण आपल्या नकळतच तिच्या प्रेमात पडण्याची दाट शक्यता आहे. प्रेम हे एक पवित्र बंधन असून २०२१ दरम्यान आपण त्यात एकनिष्ठ राहिलात तर ते आपल्यासाठी हितावह होऊ शकेल. २०२१ च्या सुरवाती व्यतिरिक्त एप्रिल व मे तथा जुलै व ऑक्टोबर हे महिने आपल्या वैवाहिक जीवनासाठी खूपच चांगले आहेत. वृश्चिक राशीच्या विवाहितांचे २०२१ च्या सुरवाती पासूनच वैवाहिक जीवन उत्तम राहील. आपल्या जोडीदाराकडून आपल्यावर प्रेमाचा वर्षाव होत राहील. जोडीदाराकडून एखादा मौल्यवान सल्ला मिळेल जो आपणास अत्यंत उपयुक्त ठरेल. जोडीदाराच्या सल्ल्यानुसार आपण जर व्यापार केलात तर ह्या वर्षी आपणास खूप मोठा फायदा होऊ शकेल.

१२ राशींचे २०२१ चे भविष्य वाचण्यासाठी क्लिक करा! 

आर्थिक (Scorpio, Finance Horoscope 2021)

आर्थिक दृष्ट्या २०२१ ची सुरवात वृश्चिक जातकांसाठी खूपच चांगली होईल. आपण ज्या क्षेत्रात कार्यरत असाल त्या क्षेत्रातून आपणास उत्तम धन प्राप्ती होईल. ह्या पैशांची आपण बचत करून स्थिर स्वरूपात लक्ष्मी प्राप्त कराल. २०२१ दरम्यान आपली आर्थिक स्थिती मुख्यत्वे उत्तमच राहील. आपले खर्च सुद्धा कमी झाल्याने आर्थिक नियोजनात विशेष अडचणी येणार नसल्या तरी २०२१ च्या मध्यास विशेषतः मे ते जुलै महिन्या दरम्यान आपणास धनप्राप्तीसाठी अधिक प्रयत्नशील राहावे लागेल, इतकेच नव्हे तर काही खर्च सुद्धा करावे लागतील. असे असले तरी सुद्धा आपली आर्थिक स्थिती मजबूतच राहील. वृश्चिक राशीच्या जातकां जवळ प्राप्तीची ठोस साधने राहिल्याने आर्थिक नियोजन करणे त्यांना सोपे जाईल.

नोकरी, व्यवसाय, करिअर (Scorpio, Job-Career-Business Horoscope 2021)

आपण जर नोकरी करत असाल तर आपल्यासाठी २०२१ ची सुरवात चांगली होईल. आपल्या कामाची प्रशंसा होऊन आपणास नोकरीत मोठा सन्मान सुद्धा प्राप्त होईल. आपण शासकीय नोकरीसाठी परीक्षा दिली असल्यास त्यात आपणास यश प्राप्त होऊन आपली निवड सुद्धा होऊ शकते. ह्या वर्षाचे अखेरचे महिने आपणास नोकरीसाठी चांगले आहेत. असे असले तरी मार्च ते एप्रिलच्या मध्यापर्यंतच्या दिवसात नोकरीत बदल होण्याच्या शक्यतेमुळे आपणास काळजी घ्यावी लागेल. ह्या व्यतिरिक्त जून व जुलै दरम्यान नोकरी सुटण्याची शक्यता असल्याने काळजी घेणे आवश्यक आहे. काही जातकांना ऑगस्ट महिन्यात नोकरीत स्थानांतर संभवते. सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात पदोन्नती होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिन्यात कामाच्या निमित्ताने परदेशी जावे लागण्याची शक्यता आहे. वृश्चिक राशीच्या व्यापाऱ्यांना आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर व्यापार वृद्धी करता येईल. असे असले तरी २०२१ च्या मध्यास व्यापारात थोडी मंदी येईल, मात्र अखेरचे महिने चांगले जातील. 

शिक्षण (Scorpio,Education Horoscope 2021)

२०२१ ह्या वर्षाची सुरवात वृश्चिक राशीच्या विद्यार्थ्यांसाठी चांगली होणार असून आपल्या कष्टांचे योग्य फळ आपणास यंदा मिळणार आहे. आजवर आपण जे कष्ट उपसलेत त्याचे यथायोग्य फळ मिळून आपली शैक्षणिक उन्नती होईल. उच्च शिक्षणासाठी मात्र ग्रहांच्या प्रतिकूलतेमुळे आपणास यश प्राप्तीसाठी अधिक प्रयत्न करावे लागतील. आपण जर अभियांत्रिकी किंवा भूगर्भ शास्त्राशी संबंधित विषयांचे अध्ययन करू इच्छित असाल तर आपणास त्यात उत्तम यश प्राप्त होऊ शकते. आपण जर परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे स्वप्न उरी बाळगून असाल तर त्यासाठी वर्षाचा अखेरचा भाग जास्त अनुकूल आहे. त्यानुसार आपली तयारी करून वर्षाच्या शेवटच्या काही महिन्यात अर्ज केल्यास आपण त्यात यशस्वी होऊ शकाल.

आरोग्य  (Scorpio,Health Horoscope 2021)

आरोग्याच्या बाबतीत वृश्चिक व्यक्तींसाठी २०२१ चे वर्ष मिश्र फलदायी ठरणारे आहे. वर्षाच्या सुरवातीस आपणास तीव्र तपमान किंवा रक्ताभिसरणाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते, अर्थात ह्या समस्या अल्पकालीन असतील. वर्षाच्या मध्यास आपली प्रकृती बहुतांशी निरोगीच राहील. ह्या वर्षी शरीरास योग्य प्रमाणात विश्रांती देण्याकडे आपणास लक्ष द्यावे लागेल. तसे केल्यानेच आपण उर्जेस आपल्या शरीरात प्रवाहित करून आपल्या आरोग्याची योग्य प्रमाणात काळजी घेऊ शकाल. अति थंड पदार्थांच्या सेवनाने आपणास घशाशी संबंधित त्रास होण्याची शक्यता असल्याने काळजी घ्यावी.

टॅग्स :horoscope 2021राशिभविष्य २०२१