आजचे राशीभविष्य - २९ जुलै २०२० - कर्कसाठी खर्चाचा, वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 06:54 AM2020-07-29T06:54:54+5:302020-07-29T07:12:30+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...
मेष
आज सांसारिक बाबी विसरून आध्यात्मिक गोष्टींत संपर्क साधाल. गूढ, रहस्यमय विद्या आणि गाढ चिंतनशक्ती आपला मानसिक भार हलका करील. आणखी वाचा
वृषभ
आपल्या जीवनसाथीच्या जवळीकीचे सुख प्राप्त होईल. कुटुंबीयांसमवेत सामाजिक समारंभासाठी बाहेर फिरणे किंवा सहलीला जाणे घडेल. त्यामुळे वेळ आनंदात जाईल. आणखी वाचा
मिथुन
अपूर्ण कामे पूर्णत्वास जाण्याच्या दृष्टीने आजचा दिवस शुभ आहे. कुटुंबात हर्षोल्हासाचे वातावरण राहील. स्वास्थ्य राहील. कामात यश आणि कीर्ती लाभेल. इतरांशी बातचित करताना रागावर ताबा ठेवा. आणखी वाचा
कर्क
शांतपणाने दिवस घालवा. कारण शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या उद्विग्नता राहील. पोटदुखीचे विकार बळावतील. अचानक पैसा खर्च होईल. प्रेमिकांमध्ये वादविवाद झाल्यामुळे रुसवे- फुगवे होतील. आणखी वाचा
सिंह
मानसिक अस्वस्थता राहील. कुटुंबीयांशी मतभेद होतील. जमीन, घर अथवा वाहनाची खरेदी किंवा खरेदीपत्र करायला दिवस योग्य नाही. आणखी वाचा
कन्या
विचार न करता साहस करण्यापासून सावधानतेचा इशारा. भावनात्मक संबंध प्रस्थापित होतील. भाऊ- बहिणींशी ताळमेळ जुळेल. मित्र आणि स्नेह्यांशी संवाद घडतील. आणखी वाचा
तूळ
आज मानसिकता नकारात्मक राहील. रागाच्या भरात वाणीवर संयम राहणार नाही. त्यामुळे कुटुंबीयांशी मतभेद होतील. नाहक खर्च होईल. तब्बेत बिघडेल. आणखी वाचा
वृश्चिक
आजचा दिवस शुभ आहे. शारीरिक आणि मानसिक प्रसन्नता वाटेल. कुटुंबातील व्यक्तींशी वागण्यात दिवस आनंदात जाईल. मित्र व स्नेही यांच्याकडून भेटवस्तू मिळतील. आणखी वाचा
धनु
आज रागामुळे कुटुंबातील व्यक्ती आणि इतर लोकांशी संबंध दुरावतील. आपले बोलणे व वागणे भांडणाचे कारण ठरेल. दुर्घटनेपासून जपा. आजारावर खर्च होईल. आणखी वाचा
मकर
आजचा दिवस प्रत्येक गोष्टीत लाभदायक आहे. मित्रांची भेट होईल. प्रिय व्यक्तींशी मुलाखत रोमांचक बनेल. विवाहोत्सुक व्यक्तींच्या समस्या किरकोळ प्रयत्नांनी सुटतील. आणखी वाचा
कुंभ
प्रत्येक काम सरळपणे होईल आणि त्यात यश मिळेल. नोकरी- व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. सरकारी कामे निर्विघ्नपणे पूर्ण होतील. वरिष्ठ अधिकारी सहकार्य करतील. आणखी वाचा
मीन
भीती आणि उद्विग्नता यातून दिवसाची सुरुवात होईल. शरीरात आळस आणि थकवा जाणवेल. कोणतेच काम पूर्ण न झाल्याने निराशा पैदा होईल. नशिबाची साथ नाही असे वाटेल. आणखी वाचा