आजचे राशीभविष्य - 3 सप्टेंबर 2021 - मेषसाठी सरकारी लाभ होतील, कर्कसाठी मानसिक चिंता राहील
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2021 07:13 AM2021-09-03T07:13:07+5:302021-09-03T07:14:02+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...
मेष
सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल आहे. सरकारी लाभ होतील. व्यापार, व्यावसायात लाभ होतील. वरिष्ठ अधिकारी खुश राहतील. आपल्या विचारांत एकदम बदल होतील. आणखी वाचा
वृषभ
आजचा दिवस आपणाला मध्यम फलप्राप्तीचा जाईल. श्रीगणेश सांगतात की मित्र आणि स्नेह्यांशी होणारी भेट आनंददायक ठरेल. आणखी वाचा
मिथुन
आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस लाभदायी राहील असे श्रीगणेश सांगतात. आज आप्तेष्टांचे सहकार्य आनंददायी ठरेल. सुंदर वस्त्रे आणि उत्तम भोजनाचा लाभ मिळेल. आणखी वाचा
कर्क
आर्थिक दृष्टीने उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होईल. डोळ्याचे विकार बळावतील. मानसिक चिंता राहील. उक्ती व कृतीवर संयम ठेवा. कोणाशी वाद होऊ नयेत याची काळजी घ्या. आणखी वाचा
सिंह
सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रांत आनंददायक व लाभदायक वार्ता प्राप्त होतील. मित्रांकडून शुभवार्ता. धनलाभ होऊन उत्पन्न वाढेल. दुपारनंतर आपल्या बोलण्यामुळे काही समस्या उद्भवणार नाही याकडे लक्ष द्या. आणखी वाचा
कन्या
घरातील व्यक्तींशी प्रेमपूर्ण संबंध राहतील. आप्तेष्टांकडून भेटवस्तू मिळतील. व्यवसाय- धंदयात वरिष्ठ अधिकारी आपल्या कामावर खुश राहतील. त्यामुळे तुमचा आनंद वाढेल. आणखी वाचा
तूळ
सकाळच्या प्रहरी मन चिंताग्रस्त राहील. शारीरिक दृष्ट्या ढिलेपणा आणि आळस वाढेल. व्यवसायात वरिष्ठ असंतुष्ट राहतील. संततीशी मतभेदाची शक्यता. आणखी वाचा
वृश्चिक
शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्य राहील. मानभंग होणार नाही याची काळजी घ्या. बोलण्यावर संयम ठेवला तर परिस्थिती अनुकूल बनू शकेल. पोटदुखीच्या विकाराने त्रस्त व्हाल. आणखी वाचा
धनु
सकाळी आनंद आणि मनोरंजना मध्ये गुंग राहाल. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. दुपारनंतर मात्र मनात नकारात्मक विचारांच्या भावनांचे ओझे वाढेल. आणखी वाचा
मकर
घरातील वातावरण सुख, शांती आणि आनंदपूर्ण राहील. मान- सन्मान मिळण्याची शक्यता. आर्थिक लाभ होईल. दुपारनंतरचा काळ स्वकीय आणि मित्र यांच्या बरोबर दक्ष राहून घालवा. वाहनसुख मिळेल. आणखी वाचा
कुंभ
आज आपणाला कलेविषयी विशेष गोडी वाटेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. संतती विषयक प्रश्न भेडसावतील. दुपारनंतर घरातील वातावरण शांतिपूर्ण राहील. शारीरिक स्वास्थ्य सुधारेल. आणखी वाचा
मीन
अधिक विचारांमुळे मानसिक थकवा जाणवेल. सबब जमीन, घर, संपत्ती इ. विषयी चर्चा न करण्याचा सल्ली श्रीगणेश देतात. अपचन व पोटाच्या तक्रारी यामुळे शारीरिक अस्वास्थ्य जाणवेल. विद्यार्थ्यांना आजचा दिवस लाभदायक आहे. आणखी वाचा