आजचे राशीभविष्य - 4 सप्टेंबर 2021 - कुंभसाठी आनंदाचा तर मेषसाठी चिंतेचा दिवस
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2021 07:19 AM2021-09-04T07:19:09+5:302021-09-04T07:19:51+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...
मेष
मानसिक व्यग्रतेत आजचा दिवस जाईल. जास्त भावनावश होऊ नका. त्यामुळे बोलण्यावर संयम न राहून त्रास होऊ शकतो. आईच्या स्वास्थ्याची काळजी घ्या. आणखी वाचा
वृषभ
आज शरीराने आणि मनाने मोकळे वाटेल. उत्साह वाढेल. मन संवेदनशील बनेल. कल्पनाशक्ती वाढल्यामुळे काल्पनिक जगाची सफर आपण कराल. कौटुंबिक विषयात रस घ्याल व प्रवासाचे बेत आखाल. आणखी वाचा
मिथुन
काम होण्यास वेळ लागेल पण प्रयत्न चालू ठेवा. कामे नक्की पूर्ण होतील. आर्थिक नियोजनात सुरुवातीला काही अडचणी येतील पण नंतर मार्ग मोकळा होताना दिसेल. आणखी वाचा
कर्क
मित्र आणि स्नेही यांच्याबरोबर आजचा दिवस तुम्ही उल्हासात घालवाल असे श्रीगणेश सांगतात. प्रवास व सहली यांची शक्यता आहे. स्वादिष्ट भोजनाचा स्वाद घ्याल. भाऊक बनाल. आणखी वाचा
सिंह
खूप भावविवश बनल्याने मन गुंतुन राहील. स्त्री वर्गापासून आज सांभाळून राहा. दलाली चर्चा वाद यापासून सांभाळून राहाल. कोर्ट कचेरीच्या बाबतीत काळजी घ्या. आणखी वाचा
कन्या
वेगवेगळ्या क्षेत्रात आज लाभ संभवतो. त्यात स्त्रीची भूमिका महत्त्वपूर्ण असेल. मित्राबरोबर एखाद्या रम्य- मनोहर स्थळी जाल. संततीकडून शुभवार्ता समजतील. आणखी वाचा
तूळ
आजचा दिवस आपल्याला शुभ आहे. नोकरी व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. वरीष्ठासोबत महत्त्वपूर्ण चर्चा कराल. पदोन्नती होऊ शकते. आणखी वाचा
वृश्चिक
नोकरी- व्यवसायाच्या ठिकाणी जपूनच काम करा. वरिष्ठांच्या नकारात्मक धोरणाने तुम्हाला त्रास होऊ शकतो. दिवस आळसात जाईल. संततीबरोबर मतभेद. आणखी वाचा
धनु
आजारावरील उपचारही प्रारंभ करू नका. वाणी आणि वर्तन यावर संयम ठेवा. अधिक संवेदनशीलतेमुळे मन व्यथित बनेल. आरोग्याकडे लक्ष द्या. पैसा अधिक खर्च होईल. आणखी वाचा
मकर
आजचा दिवस आपल्याला शुभ आहे. व्यवसाय क्षेत्रात व्यापार वाढीस लागेल. दलाली, कमिशन, व्याज इत्यादी मध्ये वाढ होईल. त्यामुळे आर्थिक स्तर मजबूत होईल. आणखी वाचा
कुंभ
आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी आहे. कामात यश तसेच कीर्ती मिळेल कुटुंबियांसमवेत दिवस चांगला जाईल. नोकरी धंद्यात सहकार्यांचे सहकार्य चांगले मिळेल. आणखी वाचा
मीन
आज आपली सृजनशक्ती अधिकच चमकेल. कल्पनाशक्तीमुळे आज आपण साहित्यविश्वाची सफर कराल. विद्यार्थ्यांसाठी अनुकूल काळ. आणखी वाचा