आजचे राशीभविष्य - 5 सप्टेंबर 2020; 'या' राशीच्या लोकांना धनलाभ होईल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2020 07:41 AM2020-09-05T07:41:50+5:302020-09-05T07:42:06+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...
मेष - शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या अस्वास्थ्याचा अनुभव येईल. सर्दी, खोकला, ताप इ. चा त्रास होईल. धर्मार्थ काम करताना दाम खर्च करावा लागेल. आणखी वाचा.
वृषभ - श्रीगणेश सांगतात की आज आपली आवक आणि व्यापार यांत वाढ होईल. व्यापारात नवीन लाभदायक संपर्क वाढतील. आणखी वाचा.
मिथुन - आज आपले प्रत्येक काम सुरळितपणे पार पडेल. घर, ऑफिस आणि सार्वजनिक ठिकाणी अनुकूल वातावरण राहिल्याने प्रसन्न वाटेल. आणखी वाचा.
कर्क - शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्या बरोबरच भाग्योदयाची संधी आपली प्रसन्नता वाढवेल. परदेशातून सुवार्ता येतील.आणखी वाचा.
सिंह - आपल्या तब्बेतीकडे विशेष लक्ष पुरविण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत. आजारपणामुळे दवाखान्याचा खर्च वाढेल. आणखी वाचा.
कन्या - सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रांत लाभाबरोबरच प्रसिद्धी पण मिळेल. स्त्री वर्गाकडून विशेष लाभ होईल. दांपत्यजीवनात परमोच्च सुखाचे क्षण अनुभवाल. आणखी वाचा.
तूळ - श्रीगणेशांच्या मते नोकरदारांसाठी आजचा दिवस अत्यंत लाभदायक आहे. नोकरीत यश आणि सफलता मिळेल. घरातील वातावरण सुखद राहील. आणखी वाचा.
वृश्चिक - आपल्या घरगुती जीवनात शांतीचे व आनंदाचे वातावरण राहील. तसेच आरोग्य चांगले राहील. आजारी माणसाच्या प्रकृतीत सुधारणा होईल. आणखी वाचा.
धनु - आज आपणात शारीरिक आणि मानसिक स्फूर्ती आणि उत्साह यांचा अभाव राहील असे श्रीगणेश सांगतात. कुटुंबात क्लेश आणि कलहजन्य वातावरण राहील. आणखी वाचा.
मकर - श्रीगणेशाच्या आशीर्वादाने आजचा पूर्ण दिवस सुखाचा जाईल. अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याने आपण प्रत्येक काम व्यवस्थित पूर्ण करू शकाल. आणखी वाचा.
कुंभ - श्रीगणेश सांगतात की द्विधा मनःस्थिती मुळे निर्णय शक्तीचा अभाव जाणवेल. परिणामतः उलघाल होईल. तब्बेत पण साथ देणार नाही. आणखी वाचा.
मीन - आज आपणाला आनंद, उत्साह आणि प्रसन्नतेचा अनुभव येईल. नवीन कार्यारंभ लाभदायक ठरेल. आणखी वाचा.