आजचे राशीभविष्य - 15 फेब्रुवारी 2022; धनलाभ होईल, महत्त्वाचे काम मार्गी लागेल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 08:16 AM2022-02-15T08:16:39+5:302022-02-15T08:20:29+5:30
Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...
मेष - नोकरीत बदलीची शक्यता आहे. कामाचे स्वरूप बदलेल. नवीन जबाबदारी अंगावर पडेल. नातेवाइकांच्या भेटीगाठी होतील. घरात चहल पहल राहील. आर्थिक व्यवहार जपून करा. आपली गोपनीय माहिती बोलण्याच्या ओघात कुणाला सांगू नका.
वृषभ - वृषभ नातेवाइकांच्या भेटीगाठी होतील. जुनी येणी वसूल होतील. एखादे लॉटरीचे तिकीट घेऊन पाहण्यास हरकत नाही. नोकरीत प्रगती होईल. व्यवसायात बरकत राहील. नावीन्यपूर्ण उपक्रम राबविल्यास फायदा होईल, तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका.
मिथुन - जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घेता येईल. नातेवाइकांच्या भेटी होतील. स्नेही जणांसमवेत गप्पाटप्पा रंगतील. धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. नवीन करार होतील.
कर्क - ग्रहमानाची अनुकूलता आपल्या बाजूने राहील. समस्या सहजपणे सोडवाल मनात आत्मविश्वास वाढेल. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. कायद्याची बंधने पाळा. वाहनाच्या दुरुस्तीकडे वेळीच लक्ष द्या. आज कुटुंबातील सदस्यांसाठी जास्त वेळ द्याल.
सिंह - मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील. त्यांना योग्य मार्गदर्शन करा आरोग्याची काळजी घ्या. खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवा. समोर चमचमीत पदार्थ दिसले म्हणून त्यावर आडवा हात मारू नका. महत्त्वाचे काम शक्यतो पुढे ढकला.
कन्या - ग्रहमानाची साथ तुम्हाला मिळेल. धनलाभ होईल. लोक मदतीसाठी स्वतः हून पुढे येतील. महत्त्वाचे काम मार्गी लागेल. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. महत्त्वाचे निरोप कळतील, खरेदीची संधी मिळेल.
तूळ - अनुकूल परिस्थिती राहील. तुमच्या कार्यपद्धतीची प्रशंसा होईल. एखाद्या सौद्यात फायदा होईल. महत्त्वाच्या कामात पुढाकार घ्याल. नातेवाइकांच्या भेटी होतील. मुलांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे. घरात आनंदी वातावरण राहील.
वृश्चिक - महत्त्वाच्या कामात पुढाकार घ्याल. आत्मविश्वास वाढेल. नशिबाची साथ मिळेल. आर्थिक आवक चांगली राहील. विद्यार्थ्यांना उल्लेखनीय कामगिरी करता येईल . मनासारखे भोजन मिळेल. मालमत्तेच्या कामात यश मिळेल.
धनू - महत्त्वाचे काम पुढे ढकलणे ठीक राहील. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. आर्थिक आवक मनासारखी राहील . घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. सदस्यांचा एकमेकांशी समन्वय राहील. व्यवसायात अभिनव उपक्रम राबविला जाईल. कठोर संभाषण टाळा.
मकर - मनावर थोडे दडपण असल्यासारखं वाटेल उपासनेमुळे मनशांती मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. कामात उत्साह राहील. खर्चावर नियंत्रण ठेवा. मौजमजा करण्यासाठी पैसा खर्च होईल. जोडीदार तुमच्या मर्जीनुसार वागेल. एकंदरीत दिवस चांगला आहे.
कुंभ - महत्त्वाचे काम पुढे ढकलणे योग्य ठरेल. दगदग होईल अशी कामे करू नका. आराम करणे आवश्यक आहे. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल . तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. तुमच्या शब्दाला मान राहील.
मीन - ग्रहमान अनुकूल आहे. विविध मार्गांनी धनप्राप्ती होईल. मुलांच्या प्रगतीमुळे आनंद होईल. त्यांच्या प्रगतीचा आढावा घ्या. जवळच्या लोकांच्या भेटीगाठी होतील. सरकारी कामे मार्गी लागतील. आवडत्या छंदासाठी वेळ काढा.