आजचे राशीभविष्य -१२ सप्टेंबर २०२०, 'या' राशीत नवीन कामात अपयश येण्याचे योग
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2020 07:03 AM2020-09-12T07:03:25+5:302020-09-12T07:04:03+5:30
जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...
मेष - आजचा दिवस शुभ फलदायक आहे. विचार एकदम बदलतील त्यामुळे महत्त्वपूर्ण कार्यात अंतिम निर्णय घेणे जमणार नाही. म्हणून आज कोणताही निर्णय घेऊ नका. आणखी वाचा
वृषभ - आज मन स्थिर ठेवण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत. कारण चंचल मनोदशेमुळे हाती आलेली संधी गमावून बसाल. समझोता करण्याची दृष्टी ठेवलीत तर कोणाशी संघर्ष होणार नाही. आणखी वाचा
मिथून - लक्ष्मीची कृपा असल्यामुळे आजचा दिवस आर्थिक दृष्टीकोनातून लाभदायक ठरेल असे श्रीगणेश सांगतात. स्वादिष्ट व रूचकर भोजन, वस्त्रालंकार तसेच मित्र व कुटुंबीय यांच्या सहवासामुळे मानसिक दृष्टया अत्यंत आनंदाचा दिवस. आणखी वाचा
कर्क - आज मनःस्थिती त्रिशंकू अवस्थेत असल्यामुळे कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका अशी सूचना श्रीगणेश देतात. संबंधित व्यक्तींशी मतभेद होतील. आणखी वाचा
सिंह - श्रीगणेश आजचा दिवस आपणाला लाभदायी आहे असे सांगतात. स्त्रिया व मित्रवर्गाकडून लाभाची शक्यता. रम्य स्थळी प्रवासाला जाल. निर्णय न घेण्याच्या वृत्तिमुळे हाती. आणखी वाचा
कन्या - शुभ फल प्राप्तीचा दिवस. नव्या कार्याचे बेत तडीस जातील. व्यापारी आणि नोकरदारांसाठी दिवस फारच चांगला आहे. व्यापारात फायदा आणि नोकरीत बढतीचे योग आहेत. आणखी वाचा
तूळ - व्यावसायिक क्षेत्रात लाभांचे संभव श्रीगणेश वर्तवितात. नोकरी आणि व्यापारात सहकारी सहकार्य करणार नाहीत. दूरचे प्रवास किंवा तीर्थक्षेत्राला भेट देण्याचे बेत ठरवाल. आणखी वाचा
वृश्चिक - आजचा दिवस शांततेत व सावधानतेत घालवा असा श्रीगणेशांचा तुम्हाला सल्ला आहे. नवीन कामात अपयश येण्याचे योग असल्याने नवीन कामे सुरू करू नका. आणखी वाचा
धनू - श्रीगणेश म्हणात की आपला आजचा दिवस आनंदात जाईल. मनोरंजनाच्या प्रसंगातून मन आनंदी राहील. विरुद्ध लिंगी व्यक्तीच्या सहवासातून आनंद मिळेल. आणखी वाचा
मकर - व्यापारातील प्रगतीसाठी आजचा दिवस लाभप्रद आहे असे श्रीगणेशांचे म्हणणे आहे. व्यवसायात तुम्ही ठरविल्या प्रमाणे काम करु शकाल. पैशाच्या देण्या घेण्यातूनही यश मिळेल. आणखी वाचा
कुंभ - आपले विचार व बोलणे यात बदलाव येईल. बौद्धिक चर्चेत भाग घ्याल. ध्यान, लेखन व सृजनात्मकता यातून आनंद मिळेल. अचानक खर्च उद्भवतील. आणखी वाचा
मीन - श्रीगणेश म्हणतात की आज आपल्यात स्फूर्ती आणि उत्साह कमी असेल. कुटुंबियांशी वादविवाद न करण्याचा श्रीगणेश सल्ला देतात. शरीर व मन अस्वस्थ असेल. आणखी वाचा