आजचे राशीभविष्य - २० सप्टेंबर २०२१: नवीन कार्यारंभ करण्यासाठी आज चांगला दिवस
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 07:23 AM2021-09-20T07:23:48+5:302021-09-20T07:24:34+5:30
Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...
मेष - श्रीगणेशाच्या कृपेने दिवस शुभ राहील. स्नेही, स्वकीय आणि मित्रांसमवेत सामाजिक कार्यात मग्न राहाल. मित्रांकडून लाभ होतील. त्यांच्यासाठी पैसा खर्च करावा लागेल. अधिक वाचा
वृषभ - आजचा दिवस आपणाला चांगला जाईल. नवीन कामाच्या योजना आखाल. नोकरदार आणि व्यावसायिकांना दिवस चांगला जाईल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील. अधिक वाचा
मिथुन - मानसिक दृष्टया आजचा दिवस द्विधा अवस्था आणि कटकटीचा राहील असे श्रीगणेशांना वाटते. शरीराने थकाल आणि आळसामुळे कामात उत्साह वाटणार नाही. अधिक वाचा
कर्क - श्रीगणेशांच्या मते प्रतिकूल परिस्थितीचा दिवस आहे. वैवाहिक जीवनात वाद होतील. तसेच व्यापारात भागीदारांबरोबर मतभेद होण्याची शक्यता आहे. अधिक वाचा
सिंह - मध्यमफलदायी दिवस. धंदा व्यवसायात मतभेद राहतील. तुमची तब्बेत चांगली राहील पण जोडीदाराच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे मनात काळजी राहील. अधिक वाचा
कन्या - श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस शुभ आहे. घरात सुख शांतीचे वातावरण पसरेल. त्यामुळे मनही प्रसन्न राहील. सुखद प्रसंग घडतील. तब्बेत चांगली राहील. अधिक वाचा
तूळ - आजचा दिवस अत्यंत सुखात जाईल. बौद्धिक कामे व चर्चेत दिवस खर्च होईल. आज कल्पनाशक्ती व सृजनशक्तीचा उपयोग आपण करू शकाल. असे गणेशजींना वाटते. अधिक वाचा
वृश्चिक - आजचा दिवस शांततेत घालवा असे श्रीगणेश सुचवतात कारण मन चिंतीत राहील व संबंधीतांशी पटणार नाही. आरोग्या विषयी काळजी लागून राहील. यशहानी किंवा धनहानी होऊ शकते. अधिक वाचा
धनु - गूढविद्या आणि अध्यात्मिकता यात तुम्ही आज मग्न राहाल. भावंडांबरोबर चांगले वर्तन राहील. नवीन कार्यारंभ करण्यासाठी चांगली वेळ आहे. मित्रमंडळींशी बोलणे होईल. अधिक वाचा
मकर - आज आपण शेअर मार्केट किंवा लॉटरी यात पैसा अडकवाल. अचानक धनलाभ होईल. कुटुंबातील वातावरण वादामुळे बिघडू शकते. काही कारणाने गृहिणींना मनात असंतोष राहील. अधिक वाचा
कुंभ - गणेशांच्या सांगण्यानुसार आज तुमचे शरीर आणि मन उत्साही असेल. दिवस लाभदायक आहे. मित्र- कुटुंबियांसमवेत एखाद्या सहलीला जाल. अध्यात्म आणि चिंतन यात प्रगती राहील. अधिक वाचा
मीन - आज मन अशांत राहील त्यामुळे एकाग्रता कमी असेल. धार्मिक कार्यासाठी पैसा खर्च होईल. पैसा गुंतवणूकीकडे आज जास्त लक्ष द्या. स्वजनापासून आज तुम्ही दुरच राहा कारण त्यांच्याशी मतभेद होऊ शकतात. अधिक वाचा