चिपळूण : विविध प्रश्नी प्रजासत्ताकदिनी उपोषणास बसलेल्या १६ उपोषणकर्त्यांपैकी १३ उपोषणकर्त्यांनी आपली उपोषणे मंगळवारी संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर मागे घेतली. मात्र, गॅज्युईटीप्रश्नी तीन वृध्दांचे व पोफळी महानिर्मिती मुख्य कार्यालयासमोर कोयना प्रकल्पबाधित तरुणांचे उपोषण सुरूच आहे.शहरातील गोवळकोट पुनर्वसनाचा प्रश्न गेली ३० वर्षे रखडला असून गोवळकोट धक्का या शासकीय जमिनीमध्ये पुनर्वसन व्हावे, या मागणीसाठी कदमवाडीतील ग्रामस्थांनी उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र, यासंदर्भात तहसीलदार जयराजे सूर्यवंशी यांच्या दालनात पुनर्वसन समितीच्या बैठकीत यावर चर्चा झाली. त्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.याबरोबर नगसेविका रसिका देवळेकर यांनी सांस्कृतिक केंद्र सुरू करण्याप्रश्नी, विनोद शिंदे यांनी माहिती अधिकारातील माहिती देण्यास टाळाटाळ होत असल्याने, तर शशिकांत सावर्डेकर (इशा अपार्टमेंट) यांनी अनधिकृत बांधकामासंदर्भात नगर परिषदेसमोर, तर मनसेचे तालुकाध्यक्ष संतोष नलावडे यांनी सांस्कृतिक केंद्राचे लोकार्पण होण्यासाठी तर जमीर खान यांनी चौपदरीकरणातील उत्खननप्रश्नी तहसील कार्यालयासमोर उपोषणास सुरू केले होते. या सर्वांना आश्वासने दिल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले.तीन निवृत्त कर्मचाऱ्यांची प्रकृती खालावलीचिपळूण आगारात रमेश शिंदे (७६) सुरेश कदम (७७) आणि दत्ताराम चव्हाण (७६) हे तिघेही वाहतूक निरीक्षक या पदावरून निवृत्त झाले आहेत. मात्र, त्यानंतर त्यांना आपल्या हक्काच्या ग्रॅच्युईटीसाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यासाठी त्यांनी उपोषण सुरू केले आहे. बुधवारी सायंकाळी या तीनही वृद्धांची प्रकृती खालावली. त्यांना तातडीने कामथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्रजासत्ताकदिनी उपोषणास बसलेल्या चिपळुणातील १६ पैकी १३ उपोषणे मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 4:11 PM
Chiplun uposhan Ratnagiri- विविध प्रश्नी प्रजासत्ताकदिनी उपोषणास बसलेल्या १६ उपोषणकर्त्यांपैकी १३ उपोषणकर्त्यांनी आपली उपोषणे मंगळवारी संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर मागे घेतली. मात्र, गॅज्युईटीप्रश्नी तीन वृध्दांचे व पोफळी महानिर्मिती मुख्य कार्यालयासमोर कोयना प्रकल्पबाधित तरुणांचे उपोषण सुरूच आहे.
ठळक मुद्देचिपळुणातील १६ पैकी १३ उपोषणे मागेप्रजासत्ताकदिनी बसले होते उपोषणास