शहरं
Join us  
Trending Stories
1
EVM वरून ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकमांनी विरोधकांना सुनावले; म्हणाले, “पराभूत झाल्यावर आता...”
2
मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी फडणवीस-पवार दिल्ली दौऱ्यावर, शिंदेना गृहमंत्रालय मिळणार की नाही?
3
"हेडमास्तर प्रमाणे प्रवचन देतात अन्..."; मल्लिकार्जुन खर्गे यांचा जगदीप धनखडा यांच्यावर निशाणा
4
परभणीत जिल्हाधिकारी कार्यालयात तोडफोड; आंदोलन पुन्हा चिघळल्याने जमावबंदीचे आदेश 
5
Video: रिल बनवण्याचा नाद भोवला! चालत्या ट्रेनमधून बाहेर लटकलेली तरूणी खाली पडली अन्...
6
अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणावर भाजप खासदार कंगना राणौतचे मोठे वक्तव्य, केली 'ही' मागणी
7
'चेस मास्टर' रहाणे! मुंबईला 'अजिंक्य' ठेवण्यासाठी भाऊच्या भात्यातून आला 'फिफ्टी प्लस'चा 'चौकार'
8
कोण आहेत सिरियाचे नवे पंतप्रधान मोहम्मद अल-बशीर? मार्च २०२५ पर्यंत पदावर राहणार, जाणून घ्या...
9
'या' सोप्या ट्रिक्स फॉलो करा ... तुमच्या व्हॉट्सॲप स्टोरेजचे टेन्शन होईल दूर!
10
परभणीत आंदोलन चिघळले, सुप्रिया सुळेंकडून निषेध व्यक्त; कठोर कारवाईची केली मागणी
11
मोठा निष्काळजीपणा! रुग्णालयात १० वर्षीय मुलाला 'O' पॉझिटिव्ह ऐवजी दिलं 'AB+' रक्त अन्...
12
Bobby Deol : "माझ्यामुळे कुटुंबाने कठीण काळ पाहिला" म्हणत बॉबी झाला भावुक; सनी देओलने पुसले अश्रू
13
२०० प्लस टार्गेट! फिफ्टी हुकली; पण Prithvi Shaw च्या भात्यातून आली 'एकदम कडक' खेळी
14
राहुल गांधींनी अचानक घेतली लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांची भेट, विषय काय?
15
"बांगलादेश ऐकत नसेल तर हिंदूंच्या रक्षणासाठी...!" RSS चं मोदी सरकारला आवाहन
16
“...तर त्याचे परिणाम भोगावे लागतील”; परभणीत आंदोलन चिघळले, प्रकाश आंबेडकरांचा इशारा
17
“‘हे’ ३ मुद्दे भाजपाला खूपच अस्वस्थ करतात, EVMबाबत सुप्रीम कोर्टात जाणार”: प्रणिती शिंदे
18
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची जबाबदारी शिंदेंच्या शिलेदाराकडून काढली; फडणवीसांकडून नवी नियुक्ती
19
फेअरनेस क्रीमने चेहरा गोरा झाला नाही; न्यायालयाने ठोठावला १५ लाखांचा दंड, ७९ रुपयांची होती खरेदी
20
SMAT 2024, BRD vs BEN : भावाच्या कॅप्टन्सीत हार्दिकनं दाखवली गोलंदाजीतील ताकद; मग संघाला मिळालं सेमीचं तिकीट

Ratnagiri: जयगड खाडीत लवकरच केरळच्या धर्तीवर हाऊसबोट प्रकल्प, पहिली चाचणी पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2024 6:16 PM

कांदळवन आणि समुद्रालगतच्या खाडी परिसरातील कोकण पर्यटकांना पाहायला मिळणार

रत्नागिरी : पर्यटनाला चालना देण्यासाठी केरळच्या धर्तीवर रत्नागिरी तालुक्यातील जयगड खाडीत हाऊसबोट प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी एक कोटी रुपयांची हाऊसबोट आणली गेली असून, तिची चाचणी घेण्यात आली. या बाेटीतून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी सैतवडे ते राई अशी सैर केली. लवकरच ही बाेट कार्यरत हाेणार आहे.उमेद प्रकल्पांतर्गत महिला बचतगटाच्या माध्यमातून हाऊसबोट रत्नागिरीलगतच्या खाड्यांची सैर घडवणार आहे. येथील कांदळवन आणि समुद्रालगतच्या खाडी परिसरातील कोकण परजिल्ह्यांतील पर्यटकांना पाहायला मिळणार असून, याद्वारे रोजगारही मिळणार आहे.हाऊसबोट प्रकल्पासाठी चार दिवसांपूर्वी एक बोट जयगड येथील खाडीत दाखल झाली आहे. ही बोट कोतवडे प्रभाग संघाला चालवण्यासाठी दिली आहे. जयगड खाडीतील सैतवडे व राई या परिसरातील पहिला प्रकल्प येत्या काही दिवसांत कार्यान्वित होणार आहे. त्याची पहिली चाचणी पूर्ण झाली आहे.

कीर्ती किरण पुजार यांनी सैतवडे ते राई अशी बोटीमधून फेरी मारली. यावेळी प्रकल्प संचालक विजयसिंह जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, जिल्हा अभियान व्यवस्थापक आयाज पीरजादे, जिल्हा व्यवस्थापक विपणन अमोल काटकर, अभियान व्यवस्थापक विशाल लांजेकर उपस्थित होते. पुढील आठ दिवसांत उर्वरित चाचण्या घेतल्यानंतर ही बोट कार्यान्वित हाेणार आहे.पाच प्रभागसंघांना प्रत्येकी १ कोटीमुंबईमधून पाच बोटी रत्नागिरी जिल्ह्यासाठी बनवण्यात आल्या आहेत. जलपर्यटनावर आधारित व्यवसाय उभे राहावेत, अशी संकल्पना कीर्ती किरण पुजार यांनी मांडली होती. त्यासाठी ‘उमेद’च्या महिलांना प्रशिक्षणही दिले गेले. सिंधुरत्न समृद्धी योजनेतून ५ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातील पाच प्रभाग संघांना प्रत्येकी १ कोटीप्रमाणे त्याचे वितरण केले गेले आहे.

जयगड खाडीत एक हाऊसबोट आली असून, ती पुढील काही दिवसांत प्रत्यक्षात पर्यटकांना फिरवण्यासाठी उपलब्ध करून दिली जाईल. या माध्यमातून पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार आहे. – कीर्ती किरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीkonkanकोकणtourismपर्यटन