आराम बस चालकावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:38 AM2021-09-07T04:38:46+5:302021-09-07T04:38:46+5:30

लांजा : आंजणारी बस थांब्यावर प्रवाशांना उतरविण्यासाठी थांबलेल्या एस. टी. बसला पाठीमागून येणाऱ्या आराम बसची धडक बसल्याची घटना ...

Accused bus driver charged | आराम बस चालकावर गुन्हा दाखल

आराम बस चालकावर गुन्हा दाखल

Next

लांजा :

आंजणारी बस थांब्यावर प्रवाशांना उतरविण्यासाठी थांबलेल्या एस. टी. बसला पाठीमागून येणाऱ्या आराम बसची धडक बसल्याची घटना रविवारी सकाळी ११.५५ वाजता घडली हाेती. या अपघाताप्रकरणी आराम बस चालकावर लांजा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजापूर आगाराचे चालक मनोहर विश्वनाथ बारस्कर हे एस. टी. बस (एमएच १४, बी.टी. १४५३) हे रत्नागिरीहून पाली मार्गे राजापूर अशी येत हाेते. आंजणारी वरील बसथांब्यावर थांबली हाेती. त्याचवेळी मुंबईहून देवगडच्या दिशेने जाणारी खासगी आराम बस (एमएच ०४, जी ८६९१) ही चालक मंजूनाथ महादेव अल्लामीला हे घेऊन येत हाेते. आंजणारी बसथांब्यावर थांबलेल्या एस. टी. बसला आराम बसची पाठीमागून धडक बसली. यामध्ये आराम बसमधील चार प्रवासी किरकोळ जखमी झाले होते. गाडीतील प्रवासी यांच्या दुखापतीस कारणीभूत आणि उभ्या असलेल्या गाडीला धडक देऊन अपघात केल्याप्रकरणी आराम बसचालकवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: Accused bus driver charged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.