विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई हाेणारच : सुदर्शन राठाेड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:28 AM2021-04-26T04:28:06+5:302021-04-26T04:28:06+5:30
दापोली : दापोलीत अत्यावश्यक सेवा वगळता अन्य काही लोक विनाकारण फिरत आहेत. अशा लोकांवर कारवाई केली जाईल. शासनाने घालून ...
दापोली : दापोलीत अत्यावश्यक सेवा वगळता अन्य काही लोक विनाकारण फिरत आहेत. अशा लोकांवर कारवाई केली जाईल. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे सर्वांनी पालन करावे. कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी लोकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन दापोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांनी केले आहे.
शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता दुकाने सुरू ठेवू नये, शासनाच्या नियमाप्रमाणे कारवाई केली जाईल. तसेच विनामास्क फिरणाऱ्या लोकांवरही दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. सर्वांनी आपली व आपल्या कुटुंबीयांची काळजी घेणे गरजेचे आहे, असे राठाेड यांनी म्हटले आहे.
काेरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यामध्ये १ मेपर्यंत शासनाने लॉकडाऊन जाहीर केले आहे. लॉकडाऊनचे सर्व नियम पाळणे बंधनकारक आहे. नियमांची पायमल्ली केल्यास कारवाई केली जाईल. परंतु, कारवाईपेक्षा आपली जबाबदारी ओळखून सर्वांनी आपल्या घरीच सुखरूप राहून शासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
दापोली शहरातील बुरोंडी नाका, केळस्कर नाका, आंबा पॉईंट, खोंडा, काळकाई काेंड, मच्छी मार्केट या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शिक्षक, पोलीसमित्र यांच्या सहकार्याने बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विनाकारण फिरणाऱ्या लोकांची ॲन्टिजेन चाचणी करण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी धसका घेतला आहे.
........................................
दापाेलीचे उपविभागीय पाेलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांनी वाहनचालकांची तपासणी सुरू केली आहे.