रत्नागिरी : रंगकाम व इंटेरियर डेकोरेशन क्षेत्रात काही वर्षातच आपल्या कामाचा ठसा उमटवणाऱ्या ‘पॉश मार्क’तर्फे बांधकाम क्षेत्राशी संलग्न सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी शहरातील मारूती मंदिर येथे उभारण्यात आलेल्या अद्ययावत दालनाचा उद्घाटन सोहळा रविवार, दि. ५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता उद्योजक किरण सामंत यांच्या हस्ते हाेणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रत्नागिरीचे नगराध्यक्ष प्रदीप साळवी, आरोग्य सभापती निमेश नायर उपस्थित राहणार आहेत.
इमारतींचा आराखडा व मार्गदर्शन, गृह सजावट व नूतनीकरण, वाणिज्यिक व किरकोळ सजावट, अंतर्गत व बाह्य रंगकाम, बांधकाम मार्गदर्शन व सेवा, मॉड्युलर किचन, वॉटरप्रुफिंगसारख्या सुविधा एकाच छताखाली ‘पॉश मार्क’तर्फे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नवीन बांधकामासहित जुन्या बांधकामांचे नूतनीकरणांतर्गत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नूतनीकरणांतर्गत घर, बंगलो, फ्लॅट्समधील दुरुस्ती, अंतर्गत टाईल्स, प्लम्बिंग, रंगकाम, स्लायडिंग, फॅर्ब्रिकेशन, लिकेज, वायरिंगची सर्व कामे करून देण्यात येणार आहेत. ‘पॉश मार्क’व्दारे एकाच ठिकाणी विविध कामे करणाऱ्या ठेकेदारांची यादी संकलित करण्यात आली आहे. ठेकेदारांनाही यामुळे काम उपलब्ध होणार आहे. शिवाय प्रत्येक कामासाठी वेगवेगळे ठेकेदार शोधत राहण्यापेक्षा एकाच ठिकाणी पाहिजे त्या कामासाठी ठेकेदार उपलब्ध होणार आहे.