खेड : मराठा आरक्षण स्थगितीचा फटका वैद्यकीय प्रवेशावर झाला आहे. आर्थिक मागास दुर्बल घटकासाठी असलेले केंद्राचे आरक्षण राज्य सरकारकडून मिळावे ही मागणी आहे. जर हे आरक्षण दिलं असतं तर मराठा समाजाची जवळपास ६०० पेक्षा जास्त मुल वैद्यकीय प्रवेशापासून वंचित राहिली नसती. सरकारची निष्क्रियता आणि सरकारमधील काही मराठा समाजाचे मंत्री यांच्यामुळे ही वेळ आल्याचा आरोप शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केला. ते खेडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी संघटनेचे सरचिटणीस विक्रांत आंब्रे उपस्थित होते. सरकारचे जर हे असंच सुरू राहिलं, तर शिवसंग्राम न्यायालयात जाईल, असा इशारा मेटे यांनी दिला आहे. दरम्यान ओबीसी आणि मराठा समाजात तेढ कशी निर्माण होईल हे पाहण्याचे काम सत्ताधारी पक्षातले आणि सरकारमधील काही मंत्री करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. जे आऊट डेटेड झालेले नेते आहेत. त्यांना पुढे करून सरकारमधील वड्डेटीवारसारखे माणसे हे काम करत असल्याचा थेट आरोप विनायक मेटे यांनी केला.तर वाढीव वीजबिले देऊन सरकारने सर्वसामान्यांच्या खिशावर दरोडा घातला आहे, याचा आम्ही निषेध करत असल्याचे मेटे म्हणाले. याबाबत दोन दिवसात ऊर्जामंत्र्यांशी आमची बैठक असल्याची माहिती त्यांनी दिली.कोरोनाची दुसरी लाट आली तर फार वाईट अवस्था असेल असे एकिकडे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे कोविड सेंटर बंद करतायत म्हणजे सरकारचं काय चाललंय हेच कळंत नाही. धोरण निश्चित नाही, निर्णय निश्चित नाही, त्याच्यावरची अंमलबजावणी नाही त्यामुळे हे गोंधळलेलं सरकार असल्याची टिकाही विनायक मेटे यांनी केली आहे.
मराठा आरक्षण स्थगितीचा फटका वैद्यकीय प्रवेशावर : विनायक मेटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2020 11:54 AM
politics, Vinayak Mete, ratnagirinews, Maratha Reservation मराठा आरक्षण स्थगितीचा फटका वैद्यकीय प्रवेशावर झाला आहे. आर्थिक मागास दुर्बल घटकासाठी असलेले केंद्राचे आरक्षण राज्य सरकारकडून मिळावे ही मागणी आहे. जर हे आरक्षण दिलं असतं तर मराठा समाजाची जवळपास ६०० पेक्षा जास्त मुल वैद्यकीय प्रवेशापासून वंचित राहिली नसती. सरकारची निष्क्रियता आणि सरकारमधील काही मराठा समाजाचे मंत्री यांच्यामुळे ही वेळ आल्याचा आरोप शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केला. ते खेडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
ठळक मुद्देमराठा आरक्षण स्थगितीचा फटका वैद्यकीय प्रवेशावरविनायक मेटे यांचा खेड येथे आरोप