संगमेश्वरातील शाळेत मुंग्यांची वारूळ, करजुवे शाळेची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 01:21 PM2019-02-05T13:21:54+5:302019-02-05T13:24:03+5:30

संगमेश्वर तालुक्यातील करजुवे गावातील प्राथमिक शाळा क्रमांक ५ ची दुरवस्था झाली असून, या शाळेत जीव मुठीत घेऊन विद्यार्थी शिक्षणाचे धडे घेत आहेत. शाळेच्या दुरवस्थेमुळे दोन वर्ग खोल्या असूनही एकाच खोलीत पाच वर्गांना शिकवण्याची वेळ येथील शिक्षकोंवर आली आहे. गेली सहा ते सात वर्षे ग्रामस्थांनी यासाठी पाठपुरावा करूनही प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Ants of Kuruksu School | संगमेश्वरातील शाळेत मुंग्यांची वारूळ, करजुवे शाळेची दुरवस्था

संगमेश्वरातील शाळेत मुंग्यांची वारूळ, करजुवे शाळेची दुरवस्था

googlenewsNext
ठळक मुद्देसंगमेश्वरातील शाळेत मुंग्यांची वारूळ, करजुवे शाळेची दुरवस्था दोन वर्गखोल्या असूनही एकाच खोलीत पाच वर्ग, अद्यापही दुर्लक्ष

आरवली : संगमेश्वर तालुक्यातील करजुवे गावातील प्राथमिक शाळा क्रमांक ५ ची दुरवस्था झाली असून, या शाळेत जीव मुठीत घेऊन विद्यार्थी शिक्षणाचे धडे घेत आहेत. शाळेच्या दुरवस्थेमुळे दोन वर्ग खोल्या असूनही एकाच खोलीत पाच वर्गांना शिकवण्याची वेळ येथील शिक्षकोंवर आली आहे. गेली सहा ते सात वर्षे ग्रामस्थांनी यासाठी पाठपुरावा करूनही प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

करजुवे शाळेत पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात असून, त्यासाठी दोन शिक्षक कार्यरत आहेत. गेल्या सहा ते सात वर्षांपासून या शाळेची एक वर्गखोली नादुरुस्त अवस्थेत बंद असल्याने येथील शिक्षक एकाच वर्गखोलीत पाच वर्गाच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

यातील काही वर्ग हे त्या एकमेव वर्गखोलीच्या व्हरांड्यात शिकवले जात आहेत. याच वर्गखोलीच्या बाजूला ही नादुरुस्त वर्ग खोली असून, पूर्णत: मोडकळीला आलेली आहे. इमारतीच्या आतील बाजूला मुंग्यानी वारुळे बांधली असून, इमारतीत सरपटणारे प्राणी, विंचू असण्याची भीती व्यक्त होत आहे.

करजुवे प्राथमिक शाळा क्रमांक ५च्या इमारतीची तत्काळ दुरुस्ती न झाल्यास करजुवे ग्रामस्थांच्यावतीने याविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला आघाडीच्या स्थानिक नेत्या संध्या प्रमोद बने यांनी दिला आहे.


अनेकवेळा पत्रव्यवहार

सन २०११ सालापासून शाळेची ही वर्गखोली बंदावस्थेत असल्याची महिती ग्रामस्थांनी दिली. याबाबत अनेकवेळा प्रशासनाला पत्रव्यवहार करण्यात आला आहे. सन २०१५ साली इमारत निर्लेखनाचा प्रस्ताव जिल्हा परिषदेला सादर करण्यात आला आहे. अनेकवेळा इमारत दुरुस्तीचे प्रस्तावही पाठवण्यात आले आहेत. गटशिक्षणाधिकारी, बांधकाम विभाग, जिल्हा परिषद यांच्याकडे यासाठी अनेकवेळा पाठपुरावा करूनही इमारतीची अवस्था आजही ह्यजैसे थेह्णच आहे.

सातबारा स्कूल कमिटीच्या नावाने

याबाबत अधिक माहिती घेतली असता, या इमारतीचा सातबारा हा स्कूल कमिटी चेअरमन या नावाने असल्याचे समजते. तो जिल्हा परिषदेच्या नावे नसल्याने इमारत दुरुस्ती करण्यात तांत्रिक अडचण येत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, ही अडचण अद्यापही दूर न झाल्याने शाळेची दुरूस्ती रखडली आहे.

Web Title: Ants of Kuruksu School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.