लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : वीजबिल वसुलीत सातत्याने अग्रक्रमावर राहिलेल्या रत्नागिरी जिल्ह्याला ग्रहण लागले असून, थकबाकीच्या रकमेत कमालीची वाढ झाली आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये लाॅकडाऊन झाले. तेव्हापासून वीजबिले वेळेवर न भरणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. जिल्ह्यातील एक लाख ८३ हजार १४३ ग्राहकांनी वीजबिलच न भरल्यामुळे ५८ कोटी ८१ लाख ५५ हजार रुपयांची थकबाकी शिल्लक आहे. सर्वाधिक थकबाकी घरगुती ग्राहकांची आहे. जिल्ह्यातील एक लाख ४७ हजार ९४३ ग्राहकांकडे २६ कोटी ३० लाख ५२ हजार रुपयांची थकबाकी शिल्लक आहे.
जिल्ह्यातील वाणिज्यिकच्या १९ हजार ९१ ग्राहकांकडे एक कोटी ९७ लाख ५५ हजार, औद्योगिकच्या २१५७ ग्राहकांकडे ६ कोटी १५ लाख ३४ हजार, कृषीच्या ४ हजार ४२१ ग्राहकांकडे ६१ लाख ५५ हजार, पथदीपाचे १,५४३ स्थानिक स्वराज्य संस्थांकडे ८ कोटी ९७ लाख ९० हजार, सार्वजनिक पाणीपुरवठा विभागाकडील १,६१९ ग्राहकांकडे २ कोटी ९९ लाख ४९ हजार, अन्य २,५४८ ग्राहकांकडे एक कोटी २५ लाख ७९ हजार मिळून एकूण एक लाख ८३ हजार १४३ ग्राहकांकडील ५८ कोटी ८१ लाख ५५ हजार रुपयांची थकबाकी वसुलीचे आव्हान महावितरणपुढे उभे ठाकले आहे.
चिपळूण विभागातील ३६ हजार ६१४ घरगुती ग्राहकांकडे सात कोटी ५५ लाख ११ हजार, वाणिज्यिकच्या पाच हजार ३३ ग्राहकांकडे ३ कोटी ३० लाख ६३ हजार, औद्योगिकच्या ५१३ ग्राहकांकडे एक कोटी ६३ लाख ९५ हजार रुपये थकबाकी आहे. कृषीच्या १,२६७ ग्राहकांकडे १७ लाख ४९ हजार, पथदीपच्या २२६ ग्राहकांकडे एक कोटी ६३ लाख ३५ हजार मिळून एकूण ४४ हजार ९५० ग्राहकांकडे १५ कोटी ६९ लाख ३१ हजार रुपयांची थकबाकी शिल्लक आहे.
खेड विभागातील ३७ हजार २४ ग्राहकांकडे ६ कोटी १३ लाख ८ हजार, वाणिज्यिकच्या ४ हजार ४४९ ग्राहकांकडे २ कोटी ४६ लाख ४३ हजार, औद्योगिकच्या ५६४ ग्राहकांकडे एक कोटी ६८ लाख ६८ हजार रुपये थकबाकी शिल्लक आहे. सार्वजनिक पाणीपुरवठा विभागाच्या ४५८ ग्राहकांकडे ८७ लाख ६८ हजार, इतर ६९ ग्राहकांकडे ३ कोटी ९१ हजार मिळून एकूण ४५ हजार २६९ ग्राहकांकडे १४ कोटी ७१ लाख ३६ हजार रुपयांची थकबाकी आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील ७४ हजार ३०५ ग्राहकांकडे १२ कोटी ६२ लाख ३२ हजार रूपयांची थकबाकी आहे. वाणिज्यिकच्या ९ हजार ६०९ ग्राहकांकडे पाच कोटी २० लाख ४८ हजार, औद्योगिकच्या एक हजार ८० ग्राहकांकडे दोन कोटी ८२ लाख ७१ हजार, कृषीच्या एक हजार ८४३ ग्राहकांकडे २५ लाख ५९ हजार, पथदीपच्या ८५४ ग्राहकांकडे ४ कोटी ३७ लाख ६० हजार, सार्वजनिक पाणीपुरवठा विभागाच्या ८२१ ग्राहकांकडे एक कोटी १९ लाख ८९ हजार, अन्य २४२९ ग्राहकांकडे एक कोटी १८ लाख ९७ हजार मिळून एकूण ९२ हजार ९२४ ग्राहकांकडे २८ कोटी ४० लाख ८८ हजार रुपयांची थकबाकी शिल्लक आहे. जिल्ह्यात सर्वाधिक थकबाकी रत्नागिरी विभागात आहे.
कोट घ्यावा
कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना घरच्या घरी देयक भरणा करण्याची सुविधा महावितरणकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोपी व सुटसुटीत पद्धत असून, ग्राहकांनी अवलंब करणे गरजेचे आहे. ‘निसर्ग’ व ‘ताैक्ते’ वादळामुळे मोठा आर्थिक फटका महावितरणला बसला असून, सद्यस्थितीत वीजबिल न भरणाऱ्यांचा वीजपुरवठा सुरू ठेवणे शक्य नसल्याने कारवाई करण्यात येणार आहे.
देवेंद्र सायनेकर, मुख्य अभियंता, महावितरण