तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत रुग्णांमध्ये जागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:24 AM2021-06-02T04:24:09+5:302021-06-02T04:24:09+5:30
रत्नागिरी : जागतिक तंबाखू नकार दिनानिमित्ताने राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमअंतर्गत जिल्हा रुग्णालयातील रुग्णांमध्ये जागृती करण्यात आली. यावेळी रुग्णांना तंबाखूजन्य ...
रत्नागिरी : जागतिक तंबाखू नकार दिनानिमित्ताने राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमअंतर्गत जिल्हा रुग्णालयातील रुग्णांमध्ये जागृती करण्यात आली. यावेळी रुग्णांना तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामांची माहिती देण्यात आली.
जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. संघमित्रा फुले - गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा सल्लागार डाॅ. शैलेश गावंडे व एनएसडीचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. उत्तमराव कांबळे यांनी या कार्यक्रमाचे नियाेजन केले हाेते. यानिमित्ताने रुग्ण व नातेवाईक यांंना मल्टिव्हिटॅमीन गोळ्यांचे वाटपही करण्यात आले. समुपदेशक प्राची आशिष भोसले यांनी रुग्णांना तंबाखूमुळे हाेणारे आजार, त्याचे शरीरावर हाेणारे दुष्परिणाम यांची माहिती दिली. यासाठी डॉ. विलास गुरव, सचिन गोपाळराव भरणे, तसेच कर्मचारी वर्ग यांचे उत्तम सहकार्य लाभले.
---------------------------
रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील रुग्णांना समुपदेशक प्राची भाेसले यांच्याहस्ते मल्टिव्हिटॅमीन गाेळ्यांचे वाटप करण्यात आले.