सायकल रॅलीच्या माध्यमातून पाेलिसांनी केली जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:24 AM2021-06-02T04:24:10+5:302021-06-02T04:24:10+5:30
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिकांमध्ये जनजागृती हाेण्याच्या दृष्टीने साेमवारी जिल्हा पोलीस दलातर्फे रत्नागिरी शहरातील ...
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिकांमध्ये जनजागृती हाेण्याच्या दृष्टीने साेमवारी जिल्हा पोलीस दलातर्फे रत्नागिरी शहरातील विविध ठिकाणी सायकल रॅली काढली़ नागरिकांनी काेराेनाच्या नियमांचे पालन करून घरातच थांबावे, यासाठी ही रॅली काढण्यात आली हाेती़
शहरातील मारुती मंदिर, नाचणे, रामआळी, टिळकआळी, लक्ष्मीचौक अशा विविध ठिकाणी रॅली काढून नागरिकांना आवाहन करण्यात आले. विनाकारण बाहेर फिरू नका, अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा. वेळोवेळी आवाहन करूनही नागरिक दिवसभर बाजारात फिरत असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर सायकल रॅलीद्वारे पोलीस दलाने जनजागृती केली. बाजारपेठेतील दुकानधारकांनाही आवाहन करण्यात आले आहे़ लोकांना घरपोच वस्तू द्याव्यात व दुकानासमोर गर्दी करू देऊ नये, अशी सूचना देण्यात आली़ या रॅलीत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, परिविक्षाधीन अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड व पोलीस कर्मचारी सहभागी झाले हाेते़
--------------------------------
काेराेनासंदर्भात जनजागृती करण्यासाठी जिल्हा पाेलीस अधीक्षक डाॅ़ माेहितकुमार गर्ग यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी शहरातून सायकल रॅली काढण्यात आली़ या रॅलीत उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, परिविक्षाधीन अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले हाेते़ (छाया : तन्मय दाते)