खेड : कोरोना संकटात महसूल, पोलीस व शिक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने राष्ट्रीयीकृत व सहकारी बँक कर्मचाऱ्यांनी अत्यावश्यक सेवा म्हणून भूमिका निभावली. आजतागायतही ते सेवा बजावत असून, हे कर्मचारी कोरोना लसीकरणापासून अजूनही वंचितच आहेत. या कर्मचाऱ्यांना प्राधान्याने
कोरोना प्रतिबंधक लस देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
लॉकडाऊनच्या काळात आर्थिक व्यवहार सुरळीत रहावे, यासाठी बँक कर्मचाऱ्यांनी अहोरात्र सेवा बजावली. कोरोनामुळे आर्थिक
व्यवस्थेवर विपरित परिणाम झाला. कोरोनामुळे काही कर्मचारी कोरोनाबाधित झाले होते. प्रशासनाच्या बरोबरीने बँक कर्मचारी सेवा
देत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व बँक कर्मचारी ‘फ्रंटलाइन वर्कर’ आहेत. कोरोनाच्या मुकाबल्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा अहोरात्र काम करत असताना बँक कर्मचाऱ्यांनी सुद्धा अत्यावश्यक सुविधा म्हणून अविरतपणे सेवा
बजावली आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना योद्धा म्हणून बँक कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात येत
आहे.