मार्गशीर्ष महिन्यात बाप्पा विराजमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 03:51 PM2019-12-02T15:51:11+5:302019-12-02T15:52:32+5:30

रत्नागिरी येथील खालची आळी मित्रमंडळाच्या मार्गशीर्ष गणेशोत्सवाला ३० नोव्हेंबरपासून प्रारंभ झाला आहे. मार्गशीर्ष गणेशोत्सव साजरा करणारे हे एकमेव सार्वजनिक मंडळ असल्याचे सांगितले जाते. या उत्सवाच्या निमित्ताने विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Bappa sits on the road heading month | मार्गशीर्ष महिन्यात बाप्पा विराजमान

मार्गशीर्ष महिन्यात बाप्पा विराजमान

Next
ठळक मुद्देमार्गशीर्ष महिन्यात बाप्पा विराजमान४ डिसेंबर रोजी श्रींची विसर्जन मिरवणूक

रत्नागिरी : येथील खालची आळी मित्रमंडळाच्या मार्गशीर्ष गणेशोत्सवाला ३० नोव्हेंबरपासून प्रारंभ झाला आहे. मार्गशीर्ष गणेशोत्सव साजरा करणारे हे एकमेव सार्वजनिक मंडळ असल्याचे सांगितले जाते. या उत्सवाच्या निमित्ताने विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

खालची आळी येथे शनिवारी सकाळी ९.३० वाजता श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यादिवशी रात्री ८ ते १० या वेळेत स्थानिक कलावंतांचे रेकॉर्ड डान्स, गीतगायन आणि विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम पार पडले. रविवारी श्री सत्यविनायक पूजा, हळदी-कुंकू, संगीत खुर्ची, विविध गुणदर्शन कार्यक्रम, तर समृध्दी दळी यांचे योगसाधनेबाबत मार्गदर्शन झाले.

या कार्यक्रमाबरोबरच २ डिसेंबर रोजी महाराष्ट्र पोलीस, रत्नागिरी शहर पोलीस स्थानक यांच्यातर्फे समाजात वाढलेल्या विविध गुन्हेगारी, सायबर क्राईम, फसवेगिरी, मोबाईल क्राईम, वाहतुकीतील शिस्त याविषयी लोकजागृती, लेडीज अवेअरनेस रस्ता-सुरक्षा यावर मार्गदर्शन करणारा सावधान रत्नागिरी हा कार्यक्रम होणार आहे.

त्याचबरोबर ३ रोजी सकाळी ११ वाजता गणेशयागाचे आयोजन केले आहे. रात्री ८ वाजता स्थानिक कलावंतांचे आजीच्या गावाला जाऊया हा गावाकडच्या बाता बतावण्या, सण, लोककला, संस्कृतीचे दर्शन घडविणारा कार्यक्रम होणार आहे. बुधवार, ४ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता ढोलताशांच्या गजरात श्रींची वाजत गाजत विसर्जन मिरवणूक निघणार आहे.

Web Title: Bappa sits on the road heading month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.