लोकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : चारही बाजूंनी पुराचा वेढा असलेल्या चिपळूणमधील (Chiplun flood) एका रुग्णालयात (Covid hospital) ऑक्सिजन अभावी 8 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे येत आहे. या प्रकाराबाबत जिल्हा प्रशासनाने अजून कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. तर विविध ठिकाणी पुरात बुडाल्यामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. (8 corona patient died due to lac of oxygen in chiplun)
गुरुवारी पहाटे तीन वाजल्यापासून चिपळुणात पाणी भरण्यास सुरुवात झाली. येथील अपरांत हॉस्पिटलही पुराच्या विळख्यात आहे. हे कोविड रुग्णालय असून तेथे २१ रुग्ण उपचार घेत होते. त्यातील काहीजण व्हेंटिलेटरवर होते. आज शुक्रवारी ऑक्सिजन अभावी यातील 8 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे येत आहे.चिपळुणात मोबाईलला नेटवर्क नाही आणि असंख्य लोकांचे मोबाईल चार्जिंगअभावी बंद झाले आहेत. त्यामुळे या हॉस्पिटलचा संपर्क पूर्णपणे तुटला होता. त्यामुळे रुग्णालयात नेमके काय झाले, याची माहिती समजलेली नाही. मात्र 8 रुग्ण दगावल्याचे सांगितले जात आहे.